लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात चारही मतदारसंघाचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. नंदुरबार व शहादा मतदारसंघात सरळ तर नवापूर व अक्कलकुवा मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे. नऊ जणांनी माघार घेतल्याने आता चार जागांसाठी एकुण 26 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात भाजपने तर नवापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीने बंड केल्याचे स्पष्ट झाल्याने या ठिकाणी तिरंगी लढती रंगणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अर्ज छाननीनंतर माघारीकडे लक्ष लागून होते. ज्या ठिकाणी बंडखोरीची शक्यता होती तेथे संबधितांच्या माघारीसाठी प्रय} झाले. तरीही नवापूर व अक्कलकुवा येथे बंडखोरी झाली आहे.
नंदुरबार : दोघांची माघारनंदुरबार मतदारसंघात एकुण सहा उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार व गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे उमेदवारी केलेले कुणाल वसावे यांनी तसेच अपक्ष उमेदवार विश्वनाथ कांतिलाल वळवी यांनी माघार घेतली आहे. आता भाजपतर्फे डॉ.विजयकुमार गावीत, काँग्रेसतर्फे उदेसिंग पाडवी, स्वाभिमानी पक्षातर्फे अॅड.प्रकाश गांगुर्डे, वंचीत बहुजन आघाडीतर्फे दीपा वळवी आणि बसपाचे विपूल वसावे हे रिंगणात आहेत. मतदारसंघात एकुण तीन लाख 38 हजार 625 मतदार आहेत. 361 मतदान केंद्र त्यासाठी राहणार आहेत. नवापूर : दहा उमेदवार रिंगणातनवापूर मतदारसंघात सर्वाधिक दहा उमेदवार रिंगणात आहेत. माघारीच्या अंतिम मुदतीत या ठिकाणी संगिता भरत गावीत व अर्चना शरद गावीत यांनी माघार घेतली. रिंगणात आता भाजपतर्फे भरत गावीत, काँग्रेसतर्फे शिरिष नाईक, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे डॉ.उल्हास वसावे, वंचीत बहुजन आघाडीचे जगन गावीत, पिपल्स पार्टी ऑफ इंडियाचे रामू महा:या वळवी, आम आदमी पार्टीचे डॉ.सुनील गावीत तर अपक्ष अजरूनसिंग वसावे, अॅड.प्रकाश गांगुर्डे, डॉ.राकेश गावीत यांच्यात लढत राहणार आहे. मतदारसंघात एकुण दोन लाख 87 हजार 614 मतदार आहेत. त्यासाठी 336 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.
शहादा : चार उमेदवारशहादा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीत अपक्ष सचिन सुदाम कोळी व मोहनसिंग पवनसिंग शेवाळे यांनी माघार घेतली. येथे भाजपतर्फे राजेश पाडवी, काँग्रेसतर्फे अॅड.पद्माकर वळवी, माकपतर्फे जयसिंग माळी आणि अपक्ष जेलसिंग पावरा हे रिंगणात आहेत. मतदारसंघात एकुण तीन लाख 20 हजार 273 मतदार आहेत. त्यात एक लाख 61 हजार 648 पुरुष तर एक लाख 58 हजार 620 महिला मतदार आहेत. मतदारसंघात एकुण 339 मतदान केंद्र राहणार आहेत.
अक्कलकुवा : सहा उमेदवारराज्याच्या पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या शहादा मतदारसंघात एकुण सहा उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीत या ठिकाणी अपक्ष किरसिंग हुन्या वसावे, जयसिंग रुखा वळवी व अॅड.रवींद्र ठोबडय़ा वसावे या अपक्षांनी माघार घेतली. येथे शिवसेनेचे आमशा पाडवी, काँग्रेसचे अॅड.के.सी. पाडवी, आपचे कैलास वसावे, ट्रायबल पार्टीचे डॉ.संजय वळवी, अपक्ष नागेश पाडवी व भरत पावरा हे रिंगणात आहेत.
अक्कलकुवा येथील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या माघारीसाठी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रय} केले. स्थानिक स्तरावर खासदार डॉ.हिना गावीत व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील प्रय} केले. परंतु उपयोग झाला नाही. अपक्ष म्हणून नागेश पाडवी मैदानात आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवाराला या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.नवापूर मतदारसंघात आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे सदस्य तथा सपाचे माजी आमदार शरद गावीत यांच्या उमेदवारीचा सामना काँग्रेस उमेदवारासह भाजप उमेदवारालाही करावा लागणार आहे.
निवडणुकीच्या रिंगणात भरत गावीत यांच्या रुपाने जिल्हा परिषद सदस्य रिंगणात उतरले आहेत. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये संगिता गावीत, किरसिंग पाडवी यांनी माघार घेतली आहे. तर नगरसेवक असलेले कुणाल वसावे यांनी देखील माघार घेतली आहे.