ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.8 - बँक व्यवस्थापनाकडून गणवेशासाठी विद्याथ्र्याचे ङिारो बँलेन्सवर खाते उघडण्यास टाळाटाळ होत असल्याने अद्यापर्पयत तब्बल 29 हजार 650 विद्याथ्र्याचे बँक खाते उघडलेले नाही़ त्यामुळे हक्काच्या गणवेशाच्या निधीपासून येथील विद्यार्थी वंचित राहत आह़े सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत लाभार्थी विद्याथ्र्याना दोन गणवेशासाठी प्रत्येक विद्यार्थी चारशे रुपयांचे वाटप करण्यात येत असत़े त्यासाठी विद्याथ्र्याना संबंधित बँकेत बँक खाते उघडणे आवश्यक आह़े पहिलीच्या विद्याथ्र्याना स्वता बँक खाते उघडणे शक्य नसल्याने संबंधित पाल्याच्या पालकांच्या नावाने बँक खाते उघडण्याची सूट देण्यात आली आह़े परंतु हे खाते ङिारो बॅलेन्सवर उघडायचे असल्याने संबंधित बँक व्यवस्थापनाकडून खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आह़े
प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यात 15 हजार 954 विद्याथ्र्यापैकी 10 हजार 572 विद्याथ्र्याची बँक खाती उघडण्यात आली आह़े त्याच प्रमाणे नवापूर 10 हजार 907 पैकी 9 हजार 200, शहादा 25 हजार 959 पैकी, 20 हजार 767, तळोदा तालुक्यात 12 हजार 233 पैकी 8 हजार 563, अक्कलकुवा तालुक्यात 19 हजार 983 पैकी 14 हजार 576 तर धडगाव तालुक्यात 16 हजार 583 पैकी 8 हजार 291 विद्याथ्र्याचे बँक खाती उघडण्यात आली आह़े एकूण 1 लाख 1 हजार 619 विद्याथ्र्यापैकी 71 हजार 969 विद्याथ्र्याचे बँक खाती उघडण्यात आली आहे. अद्याप 29 हजार 650 विद्याथ्र्याची बँक खाते उघणे बाकी आह़े आतार्पयत विद्याथ्र्याच्या बँक खात्यात गणवेशाच्या निधीसाठी 4 कोटी 6 लाख 47 हजार 600 रुपये शाळा व्यवस्थापन समितीस्तरावर वर्ग करण्यात आले आह़े