नंदुरबार जिल्ह्यात तिस:यांदा पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत
By admin | Published: July 13, 2017 1:31 PM
पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतक:यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आह़े
ऑनलाईन लोकमतलहान शहादे, जि. नंदुरबार, दि. 13 - नंदुरबार तालुक्यातील लहान शहादेसह लगतच्या परिसरातील शेतक:यांवर तिबार पेरणीचे संकट ओढावले आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतक:यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आह़ेलहान शहादेसह लगतच्या परिसरातील शेतक:यांनी आपल्या व्यथा सांगितल्या आहेत़ उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने ही आर्थिक कोंडी सोडवावी कशी असा प्रश्न निर्माण होत आह़े लहान शहादेसह परिसरात अनेक शेतक:यांनी ज्वारी, मका धुळ पेरणी केली होती़ 6 व 7 जून रोजी झालेल्या पावसाने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले होत़े परंतु पाऊस आला याचे समाधान शेतक:यांमध्ये होत़े हवामान खात्याकडूनही यंदा लवकर मान्सून असल्याचे संकेत देण्यात आले होत़े परंतु जूनच्या पहिल्या आठवडय़ात आलेल्या पावसाने मध्यंतरीच्या काळात पाठ फिरवल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आह़े 8 व 9 जूनर्पयत परिसरात 80 टक्के पेरणी झाली होती़ मात्र मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती वाईट होती़ पाण्याअभावी पीक करपली असल्याने काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी शेतक:यांना तिबार पेरणी करावी लागत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े शिंदे शिवारात 17 एकर कापूस टोचणी 10 जून रोजी करण्यात आली होती़ मात्र पाऊसच आला नसल्याने शेतक:यांची बियाणे वाया गेली होती़ अशीच परिस्थिती परिरसरातील इतरही शेतक:यांची असल्याचे सांगण्यात येत आह़े पावसाचा अनियमितपणा, त्यात खते बियाणांचा वाढीव खर्च यामुळे शेतक:यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आह़े पाण्याअभावी शेतक:यांना आपली पीक जगविणे कठीण होऊन बसले आह़े परिणामी पिकांचे नुकसान होऊन शेतक:यांना दुबार व काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागत आह़े त्यामुळे शेतक:यांचे सर्व आर्थिक गणित कोलमडले आह़े