शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

डिबीटीविरोधात तळोदा व नंदुरबारात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:30 PM

नंदुरबार : राज्य शासनाने लागू केलेला भोजन डिबीटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघर्ष समिती आणि आदिवासी हक्क संरक्षण समिती यांच्यावतीने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थी उपस्थित होत़े सकाळी 11 वाजेपासून तळोदा आणि नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ...

नंदुरबार : राज्य शासनाने लागू केलेला भोजन डिबीटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघर्ष समिती आणि आदिवासी हक्क संरक्षण समिती यांच्यावतीने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थी उपस्थित होत़े सकाळी 11 वाजेपासून तळोदा आणि नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आवारात ठिय्या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली होती़ विद्याथ्र्यानी आवारातच बसून घोषणाबाजी सुरू केली होती़ नंदुरबार प्रकल्पाधिकारी वान्मती सी़ आणि तळोदा प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े नंदुरबार येथे झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, नंदुरबार पालिकेचे बांधकाम सभापती कुणाल वसावे यांनी सहभाग घेत शासनाच्या धोरणाचा निषेध केला़ राज्यातील विविध भागात एकाच वेळी हे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी संघर्ष समितीकडून देण्यात आली़  निवेदनावर अॅड़ पद्माकर वळवी यांच्यासह दिपक मोरे, अजरुन वळवी, नाथ्या खाज्या पावरा, पंचायत समिती सभापती शांतीबाई दिवाकर पवार, दिवाकर पवार, भगवान पाडवी, राजकुमार पाडवी, आकाश वळवी, सिताराम रहासे, पूनम पाडवी, उखडय़ा वळवी, गुलाबसिंग डुमकूळ यांच्या सह्या आहेत़ तळोदा येथे माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वात विद्याथ्र्याचे ठिय्या आंदोलन करण्यात आल़े प्रसंगी माजी सभापती सी़क़ेपाडवी, प्रकाश ठाकरे, विक्रम पाडवी, विद्यार्थी संघर्ष समितीचे अॅड़ गजमल रतनसिंग वसावे, अॅड़सरदारसिंग रूपसिंग वसावे,  अॅड़ अनिल किर्ता वळवी यांच्यासह तळोदा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होत़े  राज्यातील 29 प्रकल्प कार्यालयांमध्ये विद्यार्थी संघर्ष समितीकडून हे आंदोलन करण्यात आले होत़े विद्याथ्र्यासोबत विद्यार्थिनीही उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ विद्याथ्र्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात डिबीटीचा निर्णय रद्द करण्यात यावा, पुणे ते नाशिक या दरम्यान पदयात्रा काढणा:या विद्याथ्र्याना अटक करून डांबून ठेवणारे पोलीस अधिकारी व आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी कर्मचा:यांवर कारवाई व्हावी, वसतीगृह प्रवेश व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यात यावेत, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात येऊन सामाजिक न्याय विभागाचे धोरण अंमलात आणावे, वसतीगृहासाठी शासकीय इमारती ह्या शहराच्या मध्यवर्ती भागात त्वरीत बांधण्यात याव्यात, विभागीय व जिल्हास्तरावर वसतीगृह प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी, 6 जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाची त्वरीत अंमलबजावणी करून बोगस आदिवासी विरोधात कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावेत तसेच आश्रमशाळेत सुविधा देण्याची मागणी करण्यात आली़