लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वीज वितरण कंपनीतर्फे वीज चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. नंदुरबारातील तीन ठिकाणी तपासणी करून वीज चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरणच्या ग्रामिण विभागातर्फे ही कारवाई झाली. शहरातील दुधाळे शिवारातील निलकंठनगरात राहणारे जावेद शेख यांनी त्यांच्या घरासाठी घेतलेल्या वीज वाहिनीत छेडछाड करून ४८० युनिटची चोरी केली होती. त्यांना त्याबद्दल११ हजार ५३० रुपये व दंडाचे दहा हजार रुपये असा एकुण २१हजार ५३० रुपयांचे वीज बिल भरण्यास नाकारले. त्यामुळे जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी घटना जगतापवाडी येथे घडली. सतिष कमलसिंह गिरासे यांनी ४३९ युनिट वीज चोरी केली होती. त्यांना सात हजार ९४० रुपयांचे बील व दहा हजार तडजोड रक्कम असे १७ हजार ९४० रुपयांचे एकत्रीत बील देण्यात आले, परंतु त्यांनी ते भरले नाही. त्यामुळे सतिष गिरासे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.तिसरी घटना पवन विहार कॉलनीत घडली. येथे राहणारे गौतम बळीराम मोरे यांनी ३६६ युनिट वीज चोरी केल्याचे आढळले. त्याबद्दल त्यांना १० हजार ९०रुपये बील व तडजोड रक्कम दहा हजार असा २० हजार ९० रुपयांचे एकत्रीत बील देण्यात आले. त्यांनीही भरण्यास नकार दिला. त्यामुळे गौतम मोरे यांच्या विरुद्ध देखील शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. तिन्ही फिर्यादी सहायक अभियंता राजीव रंजन यांनी दिल्या.यामुळे वीज चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वीज चोरी प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:16 PM