लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : दुचाकीचा अपघात होऊन पती-प}ी जागीच ठार तर चार महिन्यांची चिमुकली जखमी झाल्याची घटना अक्कलकुवानजीक मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, अक्कलकुवानजीकच 23 एप्रिल रोजी झालेल्या अपघातातील जखमी पतीचा उपचार घेतांना मृत्यू झाला तर प}ी व सात वर्षाचा मुलावर उपचार सुरू आहेत. मंगळवार, 1 रोजी रात्री झालेल्या अपघातात राजेश जामसिंग तडवी (27) व सरिता राजेश तडवी (25) रा.काकरापाडा, ता.अक्कलकुवा असे मयतांची नावे आहेत. पिंकी वय चार महिने ही बालिका जखमी आहे.काकरापाडा येथील तडवी दाम्पत्य आपल्या मोटरसायकलीने (क्रमांक जीजे 19- एस.5642) दलेलपूर येथे भाचीच्या साखरपुडय़ासाठी गेले होते. सायंकाळी साखरपुडा आटोपून ते परत काकरापाडा गावी जात असतांना ब:हाणपूूर-अंकलेश्वर महामार्गावर मिठय़ाफळी फाटय़ानजीक त्यांचा अपघात झाला. अपघातात तडवी दाम्पत्यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. चार वर्षीय बालिका रस्त्याच्या बाजुला खोदलेल्या केबलच्या खड्डय़ात जावून पडल्याने ती बचावली. अपघातानंतर मदतकार्य करणा:यांना केवळ दोनचजण असतील असे वाटत असतांनाच अचानक बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्याने त्या दिशेने काही जणांनी धाव घेतली असता खड्डयात बालिका जखमी अवस्थेत पडलेली आढळली. तातडीने तिला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.अपघात नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. याबाबत अक्कलकुवा पोलिसात मोटर वाहन अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीचा मृत्यूदरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातीलच देवमोगरा गावानजीक 23 एप्रिल रोजी प्रवासी रिक्षा व मोटरसायकल यांचा अपघात झाला होता. या अपघातातील संजय प्रताप जाधव रा.व्यारा, जि.तापी यांचा उपचार घेतांना 1 मे रोजी मृत्यू झाला. अपघातात संजय जाधव यांच्यासह त्यांची प}ी अनिता जाधव व सात वर्षाचा मुलगा सतिष जाधव हे देखील जखमी झाले होते.23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर देवमोगरा गावाजवळ भरधाव रिक्षाने (क्रमांक एमएच 39-डी 0208) समोरून येणा:या मोटरसायकलला (क्रमांक जीजे 19- एच 2189) धडक दिली. त्यात तिघेजण जखमी झाले होते. उपचार घेतांना संजय जाधव यांचा मृत्यू झाला. हवालदार रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक बन्सीराम आन्या पाडवी (37) रा.गंगापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रवींद्र ठाकरे करीत आहे.
अक्कलकुवानजीक दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:38 PM