खेतिया येथे ३१ ऑगस्ट रोजी दशरथ खंडू कुंभार रा.भगवती नगर खेतिया यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून स्टेट बँक ऑफ इंडिया येथून रोकड लंपास झाले होती. ३१ ऑगस्ट रोजी खेतिया येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधून दिलीप पटेल यांनी चार लाख रुपये काढून दशरथ कुंभार यांना दिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोटारसायकलीच्या डिक्कीमध्ये ठेवले आणि जवळच असलेल्या चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेले. त्यानंतर मोटारसायकलजवळ आले असता तिथे मोटारसायकलीच्या डिक्कीतून रोकड लंपास झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक संतोष सावळे व त्यांची टीमने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज मध्ये एक व्यक्ती घटनास्थळी मोटरसायकलच्या डिकीतून पैसे काढत असताना निदर्शनास आले व अशोक रोड येथून चार चाकी वाहनात बसून तेथून पसार झाला. सदर वाहन (क्रमांक एमपी ३७सी ५९१५) हे पानसेमल कडे जात असल्याचे दिसले. पोलिसांनी धामनोद, इंदौर-देवास बायपास आणि छपरी टोल येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयास्पद वाहन दिसले. ते वाहन राहुल शिवप्रसद सिसोदिया रा.केयरअप वैभव राठोर नवल मोहल्ला गंज यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान मानपुर येथील पटेल हॉटेल येथे उभी आहे त्यात दोन इसम बसले आहेत अशी गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी खेतिया येथे चोरी केल्याचा गुन्हा कबुल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून त्यांच्याकडील एकूण तीन लाख ७० हजार रुपये रोख तथा वाहन जप्त केले.
ही कारवाई खेतिया पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष सावळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलाशसिंह चौहान, गजेंद्रसिंह ठाकूर, अनिल पाठक, हवालदार आबिद शेख, रेवाराम अछाले, जावेद मकरानी, गजराज, हेमंत कुशवाह, हेमंत मंडलोई, राजेश किराडे, शिवराज मंडलोई यांनी केली.