लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील टेक भिलाटी परिसरातील 22 वर्षीय युवतीचे जबरदस्तीने पलायन केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी फरार आहे. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी संशयिताच्या घराची तोडफोड केली असून त्यांच्यावर कारवाईसाठी जुन्या पोलीस स्टेशनजवळ संतप्त जमाव गोळा झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.शहरातील टेकभिलाटी परिसरात राहाणा:या 22 वर्षीय युवतीला बबलू पठाण याच्याशी लग्न करुन देण्याच्या उद्देशाने आवेश हसन पठाण, शोएब शे. अनिस शे. व परवेज शे.अनिस शे. (सर्व रा.शहादा) यांनी संगनमताने एकत्र येऊन जबरदस्तीने बबलू पठाण याच्यासोबत मोटारसायकलीवर बसवून पळवून लावले. युवतीच्या भावाच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आवेश पठाण, शोएब शेख, परवेज शेख या तिघांना अटक केली असून मुख्य आरोपी बबलू पठाण फरार आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पी.पी. सपकाळे करीत आहेत. दरम्यान, संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी मुख्य आरोपी बबलू पठाण याच्या घराची तोडफोड केली असून एका संशयितास चांगलेच बदडून काढले. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शहरातील जुन्या पोलीस स्टेशनवर संतप्त नातेवाईक व कार्यकत्र्याचा मोठा जमाव जमा झाला होता. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी फौजफाटय़ासह तात्काळ धाव घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.
युवतीच्या अपहरणप्रकरणी शहाद्यातील तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:12 AM