लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रयाग कुंभ मेळाव्यासाठी पश्चिम रेल्वेने सहा विशेष रेल्वेगाडय़ा सुरू केल्या असून त्यातील तीन रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे जाणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.18 फेब्रुवारी रोजी बांद्रा-इलाहाबाद ही एक्सप्रेस धावणार आहे. बांद्रा येथून सकाळी 6.40 ला सुटणार असून दुस:या दिवशी सकाळी नऊ वाजता इलाहाबादला पोहचणार आहे. बोरीवली, वापी, बलसाड, उधना, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरीया, गगडरवारा, करेली, नरसिंहपूर, श्रीधाम, जबलपूर, सिहोरा, कटनी, मैसर, सतना, जैतवार, मझगाव, माणिकपूर या स्थानकावर ती थांबेल. परतीलाही तेच थांबे राहणार आहे.दुसरी एक्सप्रेस उधना-इलहाबाद असेल. 3 मार्च रोजी ती धावणार आहे. उधना येथून सकाळी 9.25 वाजता सुटेल. नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरीया, गगडरवारा, करेली, नरसिंहपूर, श्रीधाम, जबलपूर, सिहोरा, कटनी, मैसर, सतना, जैतवार, मझगाव, माणिकपूर या ठिकाणी जातांना व येतांनाही थांबणार आहे.तिसरी एक्सप्रेस वडोदरा-इलहाबाद अशी धावणार आहे. 2 मार्च रोजी वडोदरा येथून सुटणार आहे. भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरीया, गगडरवारा, करेली, नरसिंहपूर, श्रीधाम, जबलपूर, सिहोरा, कटनी, मैसर, सतना, जैतवार, मझगाव, ममाणिकपूर या स्थानकांवर थांबणार आहे. या सर्व एक्सप्रेसला टू टिअर व थ्री टिअर वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी व सामान्य बोगी राहणार आहेत. नियमितचे भाडे आकारले जाणार आहे. या दरमम्यान अर्थात 11 जानेवारी ते 25 फेब्रुवारीर्पयत हापा-सांत्रागाछी साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष रेल्वेगाडी रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
प्रयाग कुंभसाठी नंदुरबारमार्गे तीन विशेष रेल्वेगाडय़ा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:44 AM