लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : बाजार समितीत आवक होणा:या धान्याची प्रतवारी ठरवून त्याची शिफारस व्यापा:यांना केली जावी, यासाठी त्रिस्तरीय समितीची गठीत करण्यात येणार आह़े नंदुरबार बाजार समितीने याबाबत जिल्हा उपनिबंधक यांना प्रस्ताव दिला आह़े खान्देशातील बाजार समित्यांमध्ये हमीभावानुसार खरेदी करावी, कशी असा प्रश्न उपस्थित करून व्यापा:यांनी व्यवहार बंद पाडले असताना नंदुरबार बाजार समितीत मात्र खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत़ बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्या समन्वयाने ग्रेडिंग झालेल्या मालाची खरेदी विक्री करण्यावर भर दिला जात आह़े बुधवारी अक्षयतृतीया असल्याने मंगळवारी सकाळपासून बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये किमान 50 वाहनांमध्ये गहू, ज्वारी, मका विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता़ या मालाचे योग्य ग्रेडिंग करून व्यापा:यांकडून खरेदी करण्यात आली होती़ यामुळे शेतक:यांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर झाली आह़े बाजार समितीकडून बाजार समितीत येणा:या मालाची प्रतवारी ठरवून त्याची खरेदी विक्री करण्याबाबत त्रिसदस्यीय समिती तयार करण्याबाबत सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक एस़वाय़पुरी यांना प्रस्ताव दिला आह़े या समितीत सहायक उपनिबंधक, कृषी अधिकारी आणि बाजार समिती सचिव यांचा समोवश राहणार आह़े या त्रिस्तरीय समितीकडून बाजारात दर दिवशी येणा:या शेतमालाची प्रतवारी अर्थात ग्रेडिंग करून त्याची खरेदी-विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार आह़े या पद्धतीमुळे व्यापा:यांना सोयीस्कर होऊन ग्रेडिंग झालेल्या मालाची खरेदी करता येणार आह़े व्यापा:यांकडून समितीचे गठन व्हावे अशी मागणी होती़ समिती स्थापन झाल्याने संबधित अधिकारी बाजार समितीच्या लिलावांसाठी सकाळी 9 वाजेपासून उपस्थित राहतील का, असा प्रश्न असला तरी, ग्रेडींग करणा:या समितीमुळे मालाची खरेदी विक्री सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आह़े समिती गठीत केल्याचे आदेश उपनिबंधक काढणार असल्याने त्यांच्या पुढील निर्णयाकडे व्यापा:यांचे लक्ष लागून आह़े खान्देशातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापा:यांच्या बंदमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना नंदुरबार बाजार समितीत सुरू असलेल्या व्यवहारांमुळे शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला आह़े
मालाची प्रत ठरवणार त्रिस्तरीय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:23 AM