लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाºया तिघांना न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली़ शहादा न्यायालयाने हा निकाल दिला आहे़डिसेंबर २०१५ मध्ये शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी भादे ता.शहादा येथील तक्रारदार आलेले होते व त्यांची तक्रार नोंदवून घेत असतांना पोलीस ठाणे अंमलदार कक्षासमोर स्वप्नील सुनील इंगळे, किशोर भावराव बिन्हाडे, गौरव शशिकांत खरात आणि वंदना युवराज निकुंभ हे आले होते़ यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शिवदास मालचे, भिमसिंग गावीत, राहुल बोराळे, अफसर शहा व महिला पोलीस अमिता वसावे हे समज देत असताना स्वप्नील, किशोर, आणि गौरव यांनी पोलीस कमचारी शिवदास मालचे यांना मारहाण केली होती़ यातून चौघांविरोधात गुन्हा दाखल होता़ खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. कल्हापुर यांच्या न्यायालयात करण्यात आली़ यात स्वप्नील इंगळे, किशोर बिºहाडे व गौरव खरात यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना १ वर्षाचा कारावास व २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तर वंदना निकुंभे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली़ आरोपींविरोधात पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र शिरसाठ यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकार पक्षातर्फे अॅड़ जी़एम़बागुल यांनी काम पाहिले़ पैरवी अधिकारी पोलीस शिपाई आतिक सैय्यद व हर्षक रोकडे यांनी काम पाहिले़
शहाद्यात पोलीसाला मारहाण केल्याने तिघांना एक वर्षाच्या कारावसाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:47 PM