शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नवमीच्या दानातून श्रीराम प्रकटले दारी अन् प्रकाशाचा सुखदेव घेणार शिक्षणात भरारी

By भूषण.विजय.रामराजे | Published: March 31, 2023 5:37 PM

शेकडोंच्या संख्येने भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.

भूषण रामराजे, नंदुरबार: दीन दुबळ्यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वरभक्ती असे संत गाडगेबाबा म्हणत, त्यांचे हे वाक्य प्रकाशा ता. शहादा येथील राममंदिराच्या पुजारींनी शब्दश: सार्थ ठरवत रामनवमीच्या दिवशी आलेले संपूर्ण दान गावातीलच सहावीच्या गरजू विद्यार्थ्यांला दिले आहे. सुखदेव असे या चिमुरड्याचे नाव असून तो अभ्यासात हुशार असल्याने त्याच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दक्षिण काशी प्रकाशा ता. शहादा येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरी झाली. यावेळी शेकडोंच्या संख्येने भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.

प्रसंगी भाविकांकडून स्वेच्छेने काही दानदक्षिणा मंदिराचे पुजारी प्रशांत उपासनी यांना करण्यात येत होते. दिवसभरात जमा झालेली दानाची रक्कम गावातील शाळेत सहावीच्या वर्गात शिकणारा सुखदेव अशोक ठाकरे याला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.दिवसभरात शेकडोंच्या संख्येने भाविकांनी याठिकाणी दर्शन घेतल्याने दानाच्या स्वरुपात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. सायंकाळी जमा झालेली रक्कम पुजारी प्रशांत बंडू उपासणी यांनी सुखदेव अशोक ठाकरे त्याची आई आणि आजोबा यांच्या हातात दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष किशोर मुरार चौधरी, हितेश वाणी, सचिन सोनार, राजेंद्र पाटील, रामबाबा पाटील, संदीप भोई,धीरज वाणी,दिलीप वाणी  उपस्थित होते.

टॅग्स :Ram Navamiराम नवमी