शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

भाजपला धडा शिकविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:31 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याची संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याची संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.नंदुरबार येथे आज बुधवारी शिवसेनेच्या जिल्हा मेळावा घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नंदुरबारला सकाळी आगमन झाल्यानंतर वाघेश्वरी चौफुलीवर त्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी स्वागत केले.व्यासपीठावर आमदार मंजुळा गावित,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, नगरसेवक परवेज खान, शिवसेना नेते संजय उकिरडे, महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष रीना पाडवी, जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे, रुपसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित,जिल्हा परिषदेचे माजी सभापती विक्रमसिंग वळवी, तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती आकाश वळवी, माजी सभापती दत्तू चौरे, सतीश वळवी  उपस्थित होते.यावेळी वाघेश्वरी चौफुली व मोठा मारुती मंदिर चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी 'जय भवानी जय शिवाजी' च्या घोषणा दिल्या. दुपारी १२ वाजता रघुवंशी मंगल कार्यालयात जिल्हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, वर्षभर शिवसेना संकटाचा मुकाबला करीत आहे. प्रत्येक संकटाशी मुकाबला करणे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे. राज्याचा कारभार नियोजनबद्ध सुरू आहे. गोरगरीब, शेतकरी, दलित, आदिवासी ओबीसी त्याचप्रमाणे समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम शिवसेनेचं सरकार करत आहे. दर महिन्याला नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर  संपर्क ऑफिस उघडून जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक घरापर्यंत शिवसेना पोहोचवली. जिल्हाभरात गाव तिथे शाखा उघडण्यात येणार आहेत. सर्व शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका संघटीतपणे लढवायच्या आहे. शिवसेनासाठी जीवाचे रान करून येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच निवडणुका शिवसेना पुरस्कृत लढवल्या जातील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. मेळाव्यात सेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे म्हणाले, मागील पाच वर्षाच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना घुमजाव करण्यात आले. परंतु, वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन अवकाळी पाऊस,अतिवृष्टीचा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत केली. मेळाव्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पदाधिकारी गजेंद्र शिंपी यांनी केले