लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ सध्या पर्यटकांनी बहरले आह़े नववर्षाच्या स्वागतासाठी येथे अनेक पर्यटकांनी हजेरी लावली असल्याचे चित्र रविवारी दिसून आल़े जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपला ‘विकेंड’ तोरणमाळ येथे घालवला़सर्वदुर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्साह दिसून येत आह़े त्याच प्रमाणे, नंदुरबारातदेखील हा उत्साह कायम आह़े नंदुरबारातील पर्यटकांनी मावळत्या वर्षाचा सुर्यास्त पाहण्यासाठी रविवारी तोरणमाळ येथे मोठय़ा संख्येने गर्दी केल्याचे दिसून आल़े यासह नंदुरबारातील प्रकाशा बॅरेज, सारंगखेडा, दक्षिण काशी, तापी काठ, उनपदेव, दंडपाणेश्र्वर, विविध लघुप्रकल्प आदी ठिकाणीदेखील पर्यटकांकडून मोठय़ा संख्येने हजेरी लावण्यात आली आह़ेसुटीमुळे आनंदात अधिक भर.31 डिसेंबर रविवारी आल्याने अनेकांच्या आनंदात भर पडली होती़ पर्यटकांकडून विकेंडचे प्लॅनिंग करण्यात आले होत़े तोरणमाळ येथे रविवारी ऐरवीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली़ त्याच प्रमाणे अनेकांनी रविवारी तोरणमाळ येथेच मुक्काम करण्याचेही नियोजन केले होत़े पर्यटकांनी आपल्या परिवारासह तोरणमाळ येथे हजेरी लावली होती़ कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी स्वयंसेवक तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होत़ेमावळत्या सुर्यासोबत अनेकांनी काढले सेल्फी.तोरणमाळ येथे मावळत्या वर्षाचा सुर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली होती़ अनेक युवक-युवतींनी मावळत्या वर्षाच्या सुर्यासोबत सेल्फी घेतला़ जिल्ह्यातील नव्हेत तर, राज्यभरातून मोठय़ा संख्येन पर्यटक तोरणमाळ येथे आले होत़े यासाठी हॉटेल व्यवसायीकांनी खास सोय केली होती़
तोरणमाळ पर्यटकांनी बहरल़े़...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:35 PM