मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या सर्वत्र पावसाची स्थिती चांगली आहे. कधी अतिवृष्टी तर कधी महापूर येत आहे. पावसाची आकडेवारी किती हे प्रत्येकजण विचारतो. परंतु ही आकडेवारी कशी काढली जाते किंवा मिळविली जाते हे अनेकांना माहिती नसते किंवा समजत नाही. नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील 36 महसूल मंडळात बसविण्यात आलेल्या स्वयंचलित पजर्न्यमापक उपकरणातून दर 24 तासाला आकडेवारी घेवून तिचे सरासरीत वेिषण केले जाते. हवामान साक्षरतेबाबत आजही देशात अपेक्षीत चळवळ उभारली गेलेली नाही. त्यामुळे हवामान आणि पावसाच्या सरकारी आकडेवारीवरच जनतेला अवलंबून राहावे लागते. याउलट विदेशात मोठे शेतकरी आपल्या शेतात हवामानाची उपकरणे बसवून घेवून त्यानुसार पीक-पाण्याचे नियोजन करतात. याउलट स्थिती आपल्याकडे आहे. परिणामी वादळ, अतिवृष्टी यांना सामोरे जावे लागते. नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील 36 महसूल मंडळात कृषी विभागातर्फे स्वयंचीलत पजर्न्यमापक लावण्यात आले आहेत. त्यांची आकडेवारी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड होत असते. त्या आकडेवारीच्या आधारावर महसूल व कृषी विभाग जिल्ह्यातील पावसाची एकुण सरासरी आकडेवारी तयार करून ती जाहीर केली जात असते. यापूर्वी केवळ तालुका मुख्यालयात पडलेला पाऊस गृहीत धरून संपुर्ण तालुक्याचा असल्याने मानून ती आकडेवारी जाहीर केली जात होती. त्यामुळे अनेक भागात कमी पजर्न्यमान होऊनही ते जास्त दाखविले जात होते. आता ते चित्र राहिले नाही. 36 महसूल मंडळात उपकरण बसविले आहे तेथे मणुष्यबळाची कुठलीही गरज नाही. सर्व उपकरणे ही संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या आणि पुणे येथील महावेधच्या कार्यालयातून ती माहिती संकलीत केली जाते. हवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात येणा:या या उपकरणांना विजेची गरज नाही. उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाते. त्याद्वारेच उपकरणांमधील डाटा पाठविला जातो. त्यामुळे दुर्गम भागात देखील या विजेमुळे कुठलीही अडचण येत नाही.
मेट्रीक पद्धतीत मिलीमिटर तर ब्रिटीश पद्धतीत इंच एकक वापरून पाऊस मोजला जातो.4पूर्वी तहसील कार्यालयातच केवळ साधे पजर्न्यमापक राहत होते. त्यामुळे आकडेवारी अचूक राहत नव्हती. 424 तासात 65 मि.मी.पेक्षा अधीक पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी गणली जाते.
रेकॉर्ड्ीग पजर्न्यमापक हे पजर्न्यमापक स्वयंचलित असते. किती पाऊस झाला याचा विश्वासार्ह अंदाज येतो. भांडय़ात पडणारे पाणी आणि पडणा:या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते. या यंत्राला जोडलेल्या फनेलमधून पाणी एका भांडय़ात सोडले जाते. जेंव्हा विशिष्ट प्रमाणात ते भरते तेंव्हा आपोआप नळीद्वारे काढले जाते. ठरावीक प्रमाण झाल्यावर इलेक्ट्रिक सिगAलद्वारे स्वयंचलीत पेन कार्यरत होते आणि आलेख कागदावर पाण्याचे प्रमाण मोजले जाते. यामुळे 24 तासात अचूक प्रमाण मोजता येते.
ऑप्टीकल मापक..हे अॅडव्हॉन्स उपकरण लेझर डायोड आणि फोटो ट्रांङिास्टर डिटेक्टर द्वारे जोडले जाते. उपकरणातील भांडय़ात ठरावीक पातळीर्पयत पाणी जमा झाल्यावर ते पुन्हा दुस:या भांडय़ात पडते. त्या भांडय़ातील लेझर बीमुळे यंत्रात फोटो डिटेक्टरच्या सहायाने पाण्याची नोंद केली जाते. सेन्सरकडे अचूक नोंद त्याद्वारे घेतली जात असते. हे उपकरण आता हळहळू प्रचलीत होऊ लागले आहे. पाश्चात देशात याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात आहे.
नॉन रेकॉर्ड्ीग मापक : याद्वारे केवळ अंदाज बांधला जातो. याला सायमन्स रेनगेज म्हणतात. भारतात मोठय़ा प्रमाणावर याचा वापर केला जातो. नरसाळे वापरून व त्यावर आकडे लिहून हे उपकरण बनविले जाते.
अशी काढली जाते आकडेवारी.. जिल्ह्यात एकुण 36 महसूल मंडळे आहेत. या सर्व मंडळांत लावलेल्या स्वयंचलीत पजर्न्यमापकात मागील 24 तासाची पावसाची आकडेवारी जमा होते. ते संकेतस्थळावर अपलोड होते. सकाळी 8 वाजता गेल्या 24 तासाची आकडेवारी गोळा केली जाते. तालुक्याचा एकत्रीत अर्थात संबधीत मंडळांमधील मि.मी.मधील पाऊस भागिले त्या तालुक्याच्या एकुण पजर्न्यमानाची सरासरी गुणिले 100 अशा स्वरूपात जो आकडा येतो तो त्या तालुक्याचा सरासरी गेल्या 24 तासाचा पाऊस असतो. तर सर्व 36 मंडळांचा एकुण सरासरीचा मि.मी.मधील पाऊस भागिले जिल्ह्याचा एकुण सरासरी पाऊस गुणिले 100 यातून जो आकडा येतो तो जिल्ह्यात गेल्या 24 तासात झालेला सरासरी पाऊस असतो. अशाच स्वरूपाची महिनानिहाय सरासरी त्या त्या तालुक्याची आणि एकुण जिल्ह्याची काढली जाते.