धडगाव : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले चर्च स्थापन करण्यात आले होत़े येथून पुढे नंदुरबार जिल्ह्यात ािस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरु झाला़ केवळ धर्मप्रसारापुरतेच न मर्यादित राहता मुंदलवड येथे गोरगरीब आदिवासी विद्याथ्र्यासाठी 1904 सालापासून प्राथमिक शाळेलाही सुरुवात करण्यात आल्याची माहिती आह़ेब्रिटीश शासनकाळात स्वीडन येथून भारत भेटीवर आलेल्या ए़बी़फ्रँकलीन यांनी सातपुडय़ात 1902 साली भेट दिल्याची माहिती आह़े या भेटीदरम्यान त्यांनी मुंदलवड येथे चर्च उभारणीसाठी जागा पाहून धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केली होती़ त्यांच्या मानवतावादी दृष्टीकोनाला साद देत परिसरातील अनेकांनी सहकार्य केले होत़े यातून 1904 पासून मुंदलवड येथे चर्च सुरु करण्यात आल़े या चर्चची इमारत पुढे 1922 साली बांधण्यात आली़ जिल्ह्यातील सर्वात पहिले चर्च अशीही त्याची ख्याती असल्याचे सांगण्यात येत़े या चर्चमध्ये वर्षभर मुंदलवड येथे राहणा:या 83 ािस्ती परिवारांकडून भक्ती करण्यात येत़े प्रत्येक बुधवारी एकत्रित प्रार्थना, रविवारी लहान मुलांचा वर्ग, शुक्रवारी महिला मंडळाची बैठक आणि शनिवारी तरुणसंघाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो़ नाताळनिमित्त याठिकाणी विविध कार्यक्रमांची तयारी सध्या वेगाने सुरु आह़े दुर्गम भागातील या चर्चमध्ये नाताळच्या दिवशी पहाटेपासून केवळ मेणबत्ती हाती घेऊन दिवस उजाडण्यापूर्वी ािस्ती बांधवांकडून प्रार्थना करण्यात येत़े विश्व आणि मानव कल्याणासाठी मेणबत्तीच्या प्रकाशात ही प्रार्थना करण्यात येत असल्याची माहिती येथील रेव्हरंड विरेंद्र गार्दी यांनी दिली़ नाताळसाठी मुंदलवड आणि धडगाव अशा दोन्ही चर्चचे सुशोभिकरण करण्यात येत आह़े या चर्चमध्ये नाताळनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम रंगणार आहेत़
मुंदलवडच्या 106 वर्षे जुन्या चर्चमध्ये नाताळनिमित्त पहाटेच्या प्रार्थनेची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:45 PM