लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये महिलेची छेड काढल्याच्या वादातून रविवारी रात्री रेल्वेस्थानकात दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय छेड काढणा:या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे. मुकेश पाटील, मंगेश राजपूत रा.अमळनेर, महेंद्र लालझर रा.नगर अशी छेडखानी करणा:या संशयीतांची नावे आहेत. रात्री साडेनऊ वाजता येणा:या पॅसेंजरमध्ये हा प्रकार घडला होता. महिलेने मोबाईलद्वारे नातेवाईकांना ही माहिती दिली होती. पॅसेंजर येताच नातेवाईकांनी तिघांना ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी नकार देताच जमावाने दगडफेक केली. त्यात पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी जखमी झाले. रेल्वे पोलीस आणि नंदुरबार पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेनंतर महिला निघून गेल्याने दुस:या दिवशी ओळख पटवून महिलेला फिर्याद देण्यासाठी रेल्वे पोलिसांनी पाचारण केले होते. सायंकाळी उशीरार्पयत फिर्याद दाखल झालेले नव्हती. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणा:या जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित जमावातील लोकांची ओळख पटविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
रेल्वेस्थानकातील दगडफेक, जमावाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:29 AM