ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सहा दिवसांपूर्वी येथील केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्यावर अवजड वाहनामुळे झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको करून अवजड वाहनांना बंदीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची ये-जा सुरूच असल्याने किरकोळ अपघात होत आहेत.प्रकाशा येथील बसथांब्यापासून तीन रस्ते जातात. तळोदा, शहादा व केदारेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते आहेत. त्यापैकी केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा अरुंद व वळणाचा आहे. तसेच या रस्त्यावर केदारेश्वर मंदिर, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळा, इंग्रजी माध्यम व प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने विद्यार्थी, भाविक, रुग्ण व कर्मचा:यांची नेहमी वर्दळ राहत असल्याने अवजड वाहनांना बंदी आहे. अवजड वाहनांना बंदी दर्शविणारा फलकही बसथांब्याजवळ लावण्यात आला आहे. मात्र वाहन चालक या सूचनेला न जुमानता सर्रासपणे वाहने नेतात. अवजड वाहनांमुळे नेहमी लहान-मोठे अपघात होतात.16 मे रोजी कवळीथ येथील अभियंता रितेश पाटील हे डय़ुटीवर मोटारसायकलीने जात असताना केदारेश्वर मंदिराजवळील वळणावर समोरुन येणा:या अवजड वाहनाने त्यांना धडक देऊन फरफटत नेले. या घटनेत रितेश पाटील यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी तापी नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन करून हा रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. मात्र पाच दिवस झाले तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीसंबंधी काहीही कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. पाच दिवसात किमान एका वाहतूक पोलीस कर्मचा:याची नेमणूकही झालेली नाही. 18 मे रोजी दोन शिक्षक शहाद्याकडे जात असताना अवजड वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला कट मारला. त्यात दोन्ही जण खाली पडल्याने हाता-पायाला किरकोळ जखमा झाल्या. तसेच रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील वळणावर नंदुरबारकडून येणा:या अवजड वाहनाची धडक मोटारसायकलस्वाराने प्रसंगावधान राखून टाळली. या रस्त्यावर मोटारसायकलस्वार जीव धोक्यात घालून प्रवास करीत असून पोलीस प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.लोखंडी कमान उभारावीप्रकाशा बसथांबा ते केदारेश्वर मंदिर पुलार्पयतच्या रस्त्यावर अवजड वाहने जाऊ नये यासाठी बसथांबा व पुलाजवळ लोखंडी कमान उभारून अडथळा तयार करण्याची गरज आहे. तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला, प्राथमिक आरोग्य केंद्र, आसारामजी आश्रम, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषद शाळेजवळ गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.
प्रकाशा नजीक अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:04 PM