लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बहूप्रतीक्षित तळोदा ते नंदुरबार बस शनिवारपासून हातोडा पूलमार्गे सुरु करण्यात आल्याने या परिसरातील प्रवासी व नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. याबाबत ‘लोकमत’नेदेखील आवाज उठविला होता. दरम्यान, शनिवारी या बसच्या दोनच फे:या झाल्या होत्या. आणखी फे:या वाढविण्याची मागणी होत आहे.गुजरात राज्याच्या हद्दीतील तापी नदीवरील हतोडा पूल नुकताच सुरु करण्यात आला आहे. सध्या पुलावरुन अवजड वाहनांव्यतिरिक्त इतर चारचाकी वाहनांबरोबरच स्कूल बसला वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिनीबसला परवानगी नव्हती. साहजिकच प्रवाशांना खाजगी चारचाकी वाहनांचा आसरा घ्यावा लगात होता. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन हे खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक जादा भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करीत असल्याच्या आरोप होता. त्यांच्या मनमानीने प्रवाशी अक्षरश: वैतगले होते. त्यामुळे हातोडा पूलमार्गे तलोदा ते नंदुरबार मिनी बस सुरु करावी यासाठी सातत्याने मागणी होत होत होती. परंतु राज्य परिवहन महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या उदासीनतेमुळे बस सुरु होण्यास विलंब होत होता. मात्र जनतेने पुन्हा रेटा लावला व आमदार उदेसिंग पाडवी यांनीही परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रांकडे पाठपुरावा केला. परिणामी या दोन्ही यंत्राणांकडून सकारात्मक दखल घेवून अखेर शनिवारी नंदुरबार आगाराची मिनी बस सुरु करण्यात आली. या बसने दोन फे:या मारल्या होत्या. चालक-वाहकांचा सत्कारहातोडा पूलमार्गे नंदुरबार ते तळोदा मिनी बस सुरू झाल्याने नागरिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. तसेच नागरिकांनी या बसचे चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बसची पूजा करून आरतीही करण्यात आली. चालक व वाहकांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती
प्रवाशांनी साजरा केला आनंदोत्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:09 AM