लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दूध उत्पादक शेतक:यांना पाच रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास शासन प्रतिसाद देत नसल्याने गुरूवारी सकाळी लोणखेडा बायपास रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एक तासापेक्षा अधिक काळ हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकत्र्याना पोलिसांनी अटक करून सोडून दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. दुधाला पाच रूपये अनुदान हे थेट शेतक:यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली जात आहे. यावर राज्य सरकारने चार दिवस होवूनही निर्णय घेतला नाही. त्याअुनषंगाने राज्य शासनाच्या विरोधात गुरूवारी सकाळी शहादा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंत सखाराम पाटील यांच्या उपस्थितीत अर्धातास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक थांबली होती़ दोंडाईच्याकडून येणा:या वाहनांसह प्रकाशाकडून येणारी वाहनेही रस्त्यावर थांबून होती़ यातून धुळ्याकडून येणा:या बसेसही थांबून होत्या़ अवजड वाहनांच्या अनरदबारीर्पयत रांगा लागल्याने वाहतकीवर परिणाम झाला होता़ चौफुलीवर बसून पक्षाच्या कार्यकत्र्यानीकडून घोषणाबाजी करण्यात येत होती़ या आंदोलनात तालुक्यातील विविध भागातून शेतकरी सहभागी होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होत़े लोणखेडा बायपासवर आंदोलन करणा:या कार्यकत्र्याना अटक करून त्यांना पोलीस ठाण्यात आणून सोडून देण्यात आले. याप्रसंगी कृष्णदास सखाराम पाटील, रवींद्र शंकर पाटील, र}दीप भानुदास पाटील, नथ्थू रोहिदास पाटील, प्रविण धर्मा पटेल, गणेश मंगा पाटील, संतोष छोटू माळी, महेंद्र मोहन पाटील व ईश्वर दगा चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील दुग्धउत्पादक शेतक:यांनी या आंदोलनाचे स्वागत करत दुधदरात वाढ करण्याची मागणी केली़
‘स्वाभिमानी’तर्फे शहाद्यात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:53 PM