लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील खडकी, ता.पानसेमल येथील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ बाधित महिलेचे कोरोनामुक्त असलेल्या धडगाव कनेक्शन समोर आले आहे़ महिलेस आधी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़कोरोनाबाधित महिलेला सिकलसेल अॅनिमिया आजार असल्याने धडगाव येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते़ दरम्यान २ जुलै रोजी त्रास वाढल्याने तिला धडगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणले गेले होते़ ही महिला मूळ मध्यप्रदेशाची रहिवासी असल्याची माहिती समोर आल्यानंतर नंदुरबार येथून बडवानी येथे हलवण्यात आले होते़ याठिकाणी ३ जुलै रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ दरम्यान या महिलेवर बडवानी येथे उपचार सुरू असले तरी धडगाव येथे उपचारादरम्यान किती व्यक्तींच्या संपर्कात आले किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे़ धडगाव तालुका प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़मध्यप्रदेशातील खडकी येथे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून बाधित महिला ही पानसेमल तालुक्यातील पहिली कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे़ याठिकाणी एकही कोरोनारुग्ण आजवर आढळलेला नव्हता़
मध्यप्रदेशात पॉझिटिव्ह ठरलेल्या महिलेवर धडगाव तालुक्यात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 11:55 AM