लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नंदुरबार जिल्ह्याने 100 टक्के योगदान देत 1 कोटी झाडे रोवली आहेत़ यामुळे राज्यात नंदुरबार सातव्या स्थानावर असून तीन महिन्यात जिल्ह्याने दिलेल्या उद्दीष्टय़ापेक्षा अधिक वृक्षांचे रोपण केले आह़े 1 जुलै पासून राज्यासह जिल्ह्यात वृक्षलागवडीच्या कामांना सुरुवात झाली होती़ शासनाकडून जिल्ह्याला 91 लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े यासाठी विविध भागात 95 लाख 72 हजार 955 खड्डे खोदण्यात आले होत़े यातून 36 शासकीय विभागांनी योगदान देत वृक्षारोपण सुरुच ठेवले होत़े गेल्या महिन्यात जिल्ह्यात 91 लाख झाडांचे उद्दीष्टय़ पूर्ण केल्यानंतरही विविध सामाजिक संस्था, नगरपालिका, शाळा, महाविद्यालये यांच्या साथीने जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरु होता़ यातून आजअखेरीस 1 कोटी 1 हजार 226 झाडांचे रोपण पूर्ण करण्यात आली आह़े यात सर्वाधिक 47 लाख झाडे ही एकटय़ा वनविभागाने लावली असून वनक्षेत्रांसह राखीव कुरण आणि आरक्षित जमिनींवर झाडांचे रोपण करण्यात आले आह़े एकूण 95 लाख खड्डे पूण वापरात आल्यानंतर नवीन वृक्षांच्या रोपणासाठी नव्याने खड्डे करुन वृक्षारोपण करण्यात आले आह़े यात जिल्ह्यातील 2 लाख 31 हजार 299 नागरिकांनी सहभाग दिल्याने 1 कोटींचा मोठा आकडा प्रथमच पार झाल्याची माहिती सहायक वनसरंक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आह़े
राज्यात सातव्या क्रमांकाचे वृक्ष लागवडीचे उद्दीष्टय़ पूर्ण करणा:या नंदुरबार जिल्ह्याने खान्देशातही प्रथम क्रमांक पटकावला आह़े उद्दीष्टय़पूर्तीच्या बाबतीत धुळे 21 तर जळगाव जिल्हा राज्यात 22 व्या स्थानावर आह़े शासकीय विभागांनी या उपक्रमासाठी मोठा सहभाग दिला होता़ 14 विभागांनी 100 टक्के वृक्ष लागवड केल्याची माहिती आह़े यापुढे वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला सुरुवात होणार आह़े