माझी वसुंधरा उपक्रमासाठी गणेश बुधावल गावाची निवड झाली आहे. त्याअंतर्गत गणेश बुधावल येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेला गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, विस्तार अधिकारी बी.के. पाटील यांनी भेट देऊन वृक्षारोपण, परिसर पाहणी केली. माझी वसुंधरा अभियानाबाबत करावयाच्या कामांबाबत मार्गदर्शन करून ग्रामस्थांना अभियानाची माहिती दिली. स्वच्छता, झाडे लावणे, झाडांचे संगोपन करणे, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बायोगॅस, गॅस वापरणे, शाळेमार्फत स्तुत्य कार्यक्रम राबवणे, परिसर सुशोभीकरण आदी उपक्रम ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून राबवून ‘आपले गाव, स्वच्छ गाव’ म्हणून राज्यपातळीवर बक्षीस मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. या वेळी सरपंच मंगलसिंग पाटील, जयसिंग पाडवी, कृष्णा पाडवी, महेंद्र पाडवी, अजमेर नाईक, विनायक पाडवी, ग्रामसेवक पावरा, संजीवकुमार पाडवी, मुख्याध्यापक जाधव, शिक्षक, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
गणेश बुधावल येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:32 AM