लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे बंद उपसा योजनांच्या 21 पैकी आठ योजनांची जानेवारी 2019 अखेर योजनांच्या मुख्य पाईप लाईन रायङिांगमेन व मुख्य वितरण चेंबरमध्ये पाणी टाकून चाचणी घेण्याचे नियोजन सिंचन विभागाकडून केले जात असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी दिली.सातपुडा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत उपसा योजनांच्या दुरुस्ती कामांचा आढावा घेण्ययात आला. कारखान्यातर्फे 22 बंद उपसा सिंचन योजनांपैकी 21 योजनांच्या दुरुस्तीची कामे तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सुरू आहेत. नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारीत हे काम सुरू आहे. दुरुस्ती सुरू असलेल्या 21 योजनांपैकी बिलाडी त.सा., पुसनद त.सा., दाऊळ मंदाणे, ता.शिंदखेडा, श्री विध्यासिनी अक्कडसे लार्ज धमाणे, सौ.कमलताई विरदेल या पाच उपसा योजनांच्या व्यवस्थापक कमिटीच्या विनंती अर्जानुसार त्या योजनांच्या थकीत वीज बिलाचा प्रथम हप्ता योजनांच्या वतीने कारखान्याने महावितरण कंपनीस अदा केला आहे. तसेच श्री जयभवानी निमगूळ, श्री दत्त सारंगखेडा, बामखेडा त.त. या तीन उपसा योजनांच्या व्यवस्थापक कमिटीच्या विनंती अर्जानुसार त्यांचीही थकीत वीज बिलाचा प्रथम हप्ता भरण्यात येईल. वरील आठ योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊन योजनांची चाचणी घेण्यात येईल. मुख्य पाईप लाईनीत (रायङिांगमेन) व डिलेव्हरी चेंबरमध्ये पाणी टाकून चाचणी घेतल्यानंतर लाभक्षेत्रातील पाणी वितरण पाईप लाईनीमध्ये पाणी टाकून चाचणी घेण्यात येणार आहे. स्लुईस व्हॉल्व्ह लावणे, चेंबर बांधणे व संबंधित दुरुस्तीची कामे मार्च 2019 अखेर होणे अपेक्षित आहे. या आठ योजनांच्या सर्व प्रकारची कामे झाल्यानंतर साधारणत: 13 हजार 310 एकर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे. यापैकी तीन हजार एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवडीसाठी सातपुडा साखर कारखान्यातर्फे नियोजन करण्यात येत आहे.आठ उपसा योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर सातपुडा साखर कारखान्यातर्फे ऊस लागवड होण्यासाठी नियोजन सुरू आहे. सुमारे तीन हजार एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवडीसाठी ऊस उत्पादक सभासदांना कारखान्यामार्फत उधारी तत्वावर चांगल्या प्रतीचे ऊस जातीचे प्रमाणित बेणे देण्यात येणार आहे. प्रती एकरी एक मेट्रीक टन एक डोळा लागण पद्धतीने लागवडीसोबत 20 गोण्या पुष्पकमल सेंद्रीय खत, कृषी निविष्ठा कारखान्यातर्फे देण्यात येणार आहे. त्याबाबत कारखान्याच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. ज्या शेतक:यांच्या प्रमाणित ऊस जातीचे प्लॉट असतील त्यांनी बेण्यासाठी राखून ठेवून कारखान्यास माहिती द्यावी. जेणेकरून संबंधित शेतक:यांना ऊस बेणे उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.
जानेवारीअखेर ुउपसा योजनांची चाचणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:47 AM