लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : भरधाव ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तळोदा पालिकेने नव्यानेच तयार केलेल्या दुभाजकावर जावून धडकल्याने वाहनाचे व दुभाजकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली.मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री शिरपूरहून अंकलेश्वरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एमएच 18- एए 9897) भरधाव होता. तळोदा शहरात प्रवेश करताच समोरून येणा:या वाहनाला चुकविण्याचा प्रय}ात ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालक पप्पू पाटील याने प्रय} करूनही ट्रक न थांबविता आल्याने नव्यानेच तयार केलेल्या दुभाजकावर जावून आदळला. त्यामुळे ट्रकचे आणि दुभाजकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. चालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे.दरम्यान, यापूर्वी देखील असाच अपघात या ठिकाणी झाला होता. त्यामुळे रेडीयमचे दिशादर्शक फलक लावल्यास अपघात टळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पालिकेने उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.
तळोद्यात ट्रक ‘ब्रेक फेल’ झाल्याने दुभाजकावर आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:15 PM