लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटय़ाजवळ कापसाच्या सरकीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर आदळल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. वीज प्रवाह खंडित होता म्हणून मोठा अनर्थ टळला.जालना येथून कापसाची सरकी भरून जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. 18 बीए- 2311) भरधाव वेगात खेतियाकडे जात होता. पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा ट्रक सुलतानपूर फाटय़ाजवळ ब्राrाणपुरी येथील शेतकरी प्रकाश मदन पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर आदळून उलटला. अपघात घडला त्यावेळी वीज प्रवाह खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला. शहादा येथील वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांना माहिती मिळताच सहायक अभियंता मधू गावीत यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत विद्युत रोहित्राचे सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या रोहित्राची दुरुस्ती होईर्पयत वीजपुरठा खंडित राहण्याची शक्यता असून शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटय़ाजवळ ट्रक विद्युत रोहित्रावर आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:00 PM