लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर अक्कलकुवा ते खापरच्या दरम्यान पपईने भरलेला ट्रक उलटल्यामुळे पूर्णपणे जळाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात ट्रकमध्ये भरलेली पपई पूर्णपणे जळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा येथून पपई भरून गुजरात राज्यात जाणारा ट्रक (क्रमांक आर.जे.19 जी.ए. 7619) बुधवारी रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास अक्कलकुवा ते खापर दरम्यानच्या जामली फाटय़ाजवळील वळणावर आला असता भरधाव वेग व वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात जाऊन आदळला. भरधाव वेगात असलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रकने पेट घेतला. या ट्रकमध्ये चालकासह सहचालक असे दोन जण असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. यात चालकाला गंभीर दुखापत झाली तर सहचालकही जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक व अन्य वाहन चालकांनी ट्रकमधून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी हलविले.या ट्रकमध्ये पपई भरलेली होती. शहाद्याहून व्यापा:यांनी खरेदी केलेली ही पपई गुजरात राज्यात घेऊन जात असताना ही घटना घडली. या अपघातात ट्रकने पेट घेतल्याने ट्रकमधील निम्म्याहून जास्त पपई पूर्णपणे जाळून खाक झाली तर उर्वरित पपई भाजली गेल्याने तीदेखील निरुपयोगी ठरणार आहे. यामुळे व्यापा:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रकदेखील पूर्णपणे जळाला आहे. अवघ्या अर्धा ते पाऊण तासात ट्रकची कॅबीन पूर्णपणे जळून खाक झाली. सकाळी 11 वाजेपर्यत ट्रकचे काही अवशेष जळत होते. रात्रीच्या सुमारास आगीचे व धुराचे लोळ उठल्याने परिसरातील नागरीकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. बुधवारी रात्री झालेल्या या अपघाताची नोंद गुरुवारी सायंकाळर्पयत पोलिसांत करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जखमींची नावे समजू शकली नाहीत.अक्कलकुवा ते खापर दरम्यान रस्त्याचा भाग अपघात प्रवणक्षेत्र बनला आहे. वर्षभर या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असते. त्यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी अक्कलकुवा ते खापर दरम्यान कौली फाटय़ाच्या पुढील पेट्रोलपंपच्या परिसरात एकाच दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला होता. तर याच जामली फाटय़ाच्या वळणावर भरधाव ट्रक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणा:या त्याच खड्डय़ात जाऊन उलटला होता. राज्यमार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सातत्याने होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी भरधाव व अनियंत्रित वाहतुकीला चाप तसेच बेशिस्त वाहन चालकांवर संबंधित प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु अशी कोणतीही कारवाई किंवा उपाययोजना प्रशासनाकडून होताना दिसून येत नाही.
पपईने भरलेला ट्रक उलटल्याने जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:47 PM