ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.1 - शहादा तालुक्यातील डामरखेडा जवळील गोमाई नदीवरील पुलाजवळ ट्रक व ट्रॉलाची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामुळे शहादा-प्रकाशा मार्गावर चार तास वाहतूक ठप्प झाली होती.
शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास जळगावहून गुजरातकडे केळीचे घड घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जीजे 23 - टी 4818 व गुजरातकडून शहादा मार्गाने तूर घेऊन जाणारा ट्रॉला क्रमांक सीजी 04- एलक्यू 5715 यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघाताची घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून, दोन्ही वाहनचालक व क्लीनर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अल्लारखा खान, इब्राहिम खान, मोहम्मद असीम सय्यद यांना प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा:यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच ट्रॉलाचालक कैलास यादव यालादेखील नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहाटे झालेल्या अपघातामुळे ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रकाशा दूरक्षेत्राचे जमादार गौतम बोराळे, नीलेश सांगळेसह शहादा शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा:यांनी वेळीच धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, पाच जण जखमी झाले आहे. या जखमींना नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.