लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भिल्लीस्थान टायगर सेनेकडून अक्कलकुवा येथील धान्य व्यापा:यांवर दमदाटी करण्यात आली होती़ याच्या निषेधार्थ मंगळवारी संबंधित व्यापा:यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आला आह़ेयाबाबत अक्कलकुवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, सोमवारी भिल्लीस्थान टायगर सेनेच्या कार्यकत्र्याकडून कृषी विभागातील अधिकारी तसेच पोलिसांना सोबत घेत धान्य व्यापा:यांच्या दुकानात बेकायदा पध्दतीने धान्याचे वजन काटे, धान्य विक्रीचा परवाना मागण्यात आला़ आपण जणू कुणी अधिकारीच असल्याचा आव आणत हे कार्यकर्ते व्यापा:यांवर अरेरावी करीत होत़े विशेष म्हणजे यात कृषी विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारीही असल्याचा दावा व्यापा:यांनी केला आह़े त्यामुळे या बेकायदा कार्यवाहीत पोलिस व अधिकारीही सहभागी आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आह़े तसेच हे अधिकारी शासकीय नोकर आहेत की कुठल्या तरी संघटनेचे पदाधिकारी असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आह़े
अक्कलकुवा येथील धान्य व्यापा:यांचा बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:28 PM