ऑनलाईन लोकमत
प्रकाशा/बोरद,दि.5- ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर गुजरात हद्दीत वाकी नदीच्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पुरात वाहून गेला़ यामुळे राज्यमार्गावरील वाहतूक बंद झाली आह़े पुलाचे बांधकाम रखडल्याने ही स्थिती निर्माण झाली आह़े
गुजरात हद्दीत प्रकाशा ते तळोदा दरम्यान अंकलेश्वर राज्यमार्गावर सद्गव्हाण गावापासून काही अंतरावर गेल्या वर्षभरापासून पुलाचे बांधकाम सुरू आह़े यामुळे खालील बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आह़े सोमवारी तळोदा तालुक्याच्या विविध भागासह धडगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे वाकी नदीला पूर आला होता़ पुराचे पाणी वाढत असल्याने रात्री 10 वाजेनंतर वाहतूक बंद करण्यात आली़ रात्री एक वाजता पर्यायी रस्ता पूर्णपणे पाण्यात गेला़ थोडय़ा वेळात रस्ता आणि त्याखाली टाकलेले पाईप वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आह़े यामुळे तळोदा ते शहादा दरम्यान होणारी वाहतूक बोरद मार्गाने तर नंदुरबार ते तळोदा वाहतूक निझर मार्गाने सुरू करण्यात आली़ राज्यमार्गावरील वाहने प्रकाशा पुलावरून निझर चाररस्ता, कुकरमुंडा अक्कलकुवा अशी वळवली आह़े