ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.1- भाजीपाला आणि भुसार यांच्या खरेदी विक्रीतून दर दिवशी 15 लाख रूपयांचा महसूल जमा नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळतो़ शेतक:यांनी गुरूवारपासून पुकारलेल्या संपानंतर ही उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आह़े बाजारात सकाळी धान्य आणि भाजीपाला विक्री झाली होती़
धुळे जिल्ह्यातील साक्री आणि नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार आणि गुजरात राज्यातील विविध गावांमधून शेतकरी धान्य आणि भाजीपाला विक्रीसाठी आणतात़ दर दिवशी किमान 200 क्विंटल भाजीपाला आणि 700 क्विंटल धान्य विक्रीसाठी येणा:या या बाजार समितीत गुरूवारी सकाळी किरकोळ 45 क्विंटल भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला़ दर दिवशी किमान 20 लाख रूपयांची बिगर हंगामी उलाढाल होणा:या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी केवळ सात लाख रूपयांची उलाढाल झाली़ बुधवारी सायंकाळी शेतक:यांकडून व्यापा:यांना देण्यात आलेल्या मालाची विक्री गुरूवारी सकाळी झाली होती़ त्यातही हा संपूर्ण व्यवहार व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्यात झाला़
बाजारात शेतक:यांचे उत्पादन घेऊन आलेले एकही वाहन दिसून आलेले नाही़ शेतक:यांनी शेतात गाडय़ाच न भरल्याने बाजार समितीत माल पोहोचू शकलेले नाहीत़ दुपारी दोन वाजेनंतर शेतकरी येणार या प्रतिक्षेत काही व्यापारी होत़े मात्र पाच वाजेर्पयत एकही भाजीपाला घेऊन येणारे वाहन न आल्याने अखेर बाजार बंद करण्यात आला होता़