दरम्यान, दहावीची पुरवणी परिक्षा २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी सहा केंद्रांची सोय करण्यात आली आहे. एकुण २६ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. परीक्षासंदर्भात नुकतीच दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मनिषा खत्री होत्या. सदस्य म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॅा.राहुल चौधरी, डायटचे प्राचार्य तसेच सदस्य सचिव म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम होते.
बैठकीत परिक्षार्थींना पुरेसे बेंचेस बैठकीसाठी असावी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व परीक्षा केंद्राच्या आवारात स्वच्छता असावी. कॉपी होऊ देऊ नये.कॉपी प्रकरणी पर्यवेक्षक, केंद्र संचालक व विद्यार्थी यांना जबाबदार धरून कारवाई करून गुन्हा दाखल करावा. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद असावे यासह इतर सूचना देण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली.