शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

दुकानातून अडीच लाखांचे मोबाईल चोरणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 12:11 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील नवशक्ती कॅाम्पलेक्स मधील मोबाईल दुकानातून चोरट्याने दोन लाख ४९ हजार ७९९ रुपयांचे नवे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरातील नवशक्ती कॅाम्पलेक्स मधील मोबाईल दुकानातून चोरट्याने दोन लाख ४९ हजार ७९९ रुपयांचे नवे व जुने मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.गोपी गोविंद काठेवाडी, (२१) रा.संगमटेकडी, नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नवशक्ती कॅाम्पलेक्समधील संजय टाईम्स या मोबाईल विक्री व दुरूस्तीच्या दुकानातून ३ व ४ डिसेंबर रोजी रात्रीतून चोरट्यांनी  ३४ नवे व जुने मोबाईल चोरून नेले. त्याची किंमत दोन लाख ४९ हजार ७९९ रुपये इतकी आहे. सकाळी दुकान मालक शंकर नानोमल मंदाना हे दुकानात आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर शहर पोलीस ठाणे आणि एलसीबीच्या पथकाने याबाबत तपासाची चक्रे फिरवली. दुकानातील व आजूबाजुच्या दुकानांच्या बाहेरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले. त्यात शहरातील दुध डेअरीनजीक संगमटेकडी परिसरात राहणारा गोपी गोविंद काठेवाडी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी पहाटे पावणेदोन वाजता त्याला त्याच्या घरातून शिताफीने अटक केली. तपास सहायक निरिक्षक डी.एस.शिंपी व बिऱ्हाडे करीत आहेत.