लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वृंदावन कॉलनीत घरफोडीचा प्रयत्न करुन पळ काढणा:या दोघांना एलसीबीच्या पथकाने अवघ्या दोन तासात ताब्यात घेतल़े रविवारी पहाटेच्या सुमारास दोघे चोरीचा प्रयत्न करत असताना घरमालकाचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी पळ काढला होता़ प्रितेश किशनलाल खंडेलवाल यांना वृंदावन कॉलनीतील घरालगत रविवारी पहाटे दोघे संशयास्पदरितीने उभे असल्याचे दिसून आले होत़े त्यांनी आरडाओरड केल्यानंतर दोघांनी पळ काढला होता़ घटनेचे सिसीटीव्ही फुटेज खंडेलवाल यांनी लागलीच एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना पाठवले होत़े त्यांनी पडताळणी केली असता, सीसीटीव्हीत अट्टल गुन्हेगार दिसून आले होत़े एलसीबीच्या पथकाने तात्काळ मोहिम सुरु केल्यावर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास माळीवाडा परिसरातून शाहरुख खान अस्लमखान पठाण व चंद्रशेखर नथ्थू मेश्राम रा़ नंदुरबार या दोघांना ताब्यात घेतल़े दोघांनी घरफोडीच्या प्रयत्नाची कबुली दिली़ तसेच मच्छ्या रमश्या भिल, सुकलाल नारायण ठाकरे दोन्ही रा़ नंदुरबार या साथीदारांची नावे सांगितली़ या कामगिरीचे पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी कौतूक करत पथकास रोख बक्षिस घोषित केल़े पोलीस निरीक्षक नवले यांच्या पथकातील कर्मचा:यांनी ही कारवाई केली़
घरफोडीच्या प्रयत्नातील दोघांना एलसीबीकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:20 AM