लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : खेतिया ते पानसेमल परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने खेतिया पासून पाच किलोमीटर अंतरावरील भातकी गावाजवळील नाल्यात दोन पिंजरे लावल्याने या पिंज:यांमध्ये शिकार करण्याच्या इराद्याने दोन्ही बिबटय़े जेरबंद झाल्याने सुटकेचा नि:श्वास शेतमजूर व शेतक:यांनी सोडला.खेतिया ते पानसेमल मार्गावरील भातकी गावाजवळ बाळकृष्ण गोविंद पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावले होते. या पिंज:यांमध्ये बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी बक:या ठेवण्यात आल्या होत्या. शिकार करण्याच्या नादात या दोन्ही पिज:यात नर व मादी बिबट जेरबंद झाले.या बिबटय़ांनी गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे वनविभागातर्फे या परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. यासाठी खेतियाचे वनक्षेत्रपाल भुराखान, पानसेमल वनक्षेत्रपाल मंगेश बुंदेला, प्रदीप पवार, संजय मालवीय, केशवसिंह पट्टा, विजय गुप्ता, नीलेश पाटील, राजा भोये, प्रमोद गुजर्र, बाबुलाल मोर्य, महेश तोमर, अमोल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
खेतिया परिसरात दोन बिबटे जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:53 AM