शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

पंतप्रधान मोदींच्या वडनगरचा मेघराज निघाला दोन कोटीच्या लुटीचा सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:23 PM

नवापूर : पिंपळनेर रस्त्यावर रायपूर जामतलाव दरम्यान रिव्हॉल्वरचा धाक दाखवत व्यापा:याकडून दोन कोटी 51 लाख 50 हजारांच्या लूट प्रकरणातील ...

नवापूर : पिंपळनेर रस्त्यावर रायपूर जामतलाव दरम्यान रिव्हॉल्वरचा धाक दाखवत व्यापा:याकडून दोन कोटी 51 लाख 50 हजारांच्या लूट प्रकरणातील प्रमुख आरोपी मेघराज दरबार याच्या नवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 11 ऑक्टोबर रोजी हरी लुटीची घटना घडली होती़ तेव्हापासून पोलीस मुख्य संशयित मेघराज दरबार याच्या मागावर होत़े 27 वर्षीय मेघराज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव वडनगर जि. मेहसाणा येथील रहिवाशी आहे. नंदुरबारच्या पोलिसांनी त्याला सोमवारी सकाळी गुजरात राज्यातील मैहसाना जिल्ह्यातील वीसनगरमधून अटक केली. तो बसने अहमदाबादकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.रायपूर जामतलावाजवळ 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास व्यापा:याना रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवत चोरटय़ांनी दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपये लुटले होते. या घटनेनंतर अवघ्या 12 तासांत पोलिसांनी गुजरात राज्यातील मैहसाणा शहरातून एक कोटी 22 लाख27 हजार 500 रुपए हस्तगत करत राजेंद्र कानजी पटेल, अमरसिंग चैनाजी ठाकूर, अक्षय शैलेश पटेल, प्रकाश शांतीलाल पटेल, दीपक कुमार हसमुख पटेल, हार्दिक गोविंद पटेल या सहा आरोपींना ताब्यात घेतले होते. नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने मुख्य आरोपीची धरपकड करून 51 लाख रुपये ताब्यात घेऊन अटक केली आहे. आतापयर्ंत लुटीचे एकूण दोन कोटी 41 लाख 50 हजार रूपयांपैकी दोन कोटी 38 लाख 50 हजार रुपए मिळाले असून महाराष्ट्र व गुजरात पोलिस उर्वरित 30 लाख रुपयांचा शोध घेत आहेत. दरम्यान मेघराज दरबार यास ताब्यात घेत पोलीसांचे पथक सोमवारी दुपारनंतर नवापूरकडे येण्यास रवाना झाले होत़े रात्री उशिरा हे पथक नवापूर येथे दाखल झाल्याचे सांगण्यात आले आह़े त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आह़े