लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरटीओ कार्यालयातील ड्युटी लावण्याच्या वादातून या कार्यालयात अधिकाऱ्यांचे दोन गट पडले आहेत. सीमा तपासणी नाका हाच कळीचा मुद्दा आहे. त्यातूनच वाद उद्भवत आहेत. त्यामुळे या कार्यालयातील अनागोंदीबाबत आता वरिष्ठांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नेहमीच या ना त्या कारणाने गाजत असते. त्याला कारण केवळ सिमा तपासणी नाक्यांवर ड्युटी लावण्याचे हेच असते. सध्या गेल्या महिनाभरापासून कार्यालयात होणारा आपसातील वादाला देखील तेच कारण पुढे येत आहे. यामुळे दोन्ही तपासणी नाक्यांवरील महसुलावर परिणाम तर होतच आहे. शिवाय कार्यालयात कामे घेवून येणाºया नागरिकांना दिवसभर ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वादावर पडदा टाकण्याचे काम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे असतांना त्यांनी केवळ कागदी घोडे नाचविण्याचे सुरू ठेवले आहे. त्यामुळे हा प्रकार वाढत चालला आहे.रोटेशन पद्धत हवीसिमा तपासणी नाक्यांवर मिळणारा मलिदा लक्षात घेता या ठिकाणी ड्युटी लावण्यासाठी अधिकाºयांमध्ये चढाओढ असते. साहेबांच्या मर्जीतला जो असेल त्याला जास्तीत जास्त ड्युटी लावली जाते. जो मर्जीतला नाही, ऐकत नाही त्याला कार्यालयातच ड्युटी लावली जाते. वास्तविक प्रत्येक अधिकाºयाची रोटेशननुसार या ठिकाणी ड्युटी लावण्याचा प्रघात असतांना त्याला तिलांजली दिली जात असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.नागरिक वेठीस, महसूल वाºयावरयामुळे नागरिक तर वेठीस धरलाच जात आहे. शिवाय महसूल देखील वाºयावर असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी आणि स्वत: जिल्हाधिकाºयांनी देखील नंदुरबार आरटीओ कार्यालयातील अनागोंदीबाबत लक्ष घालून थेट कारवाई करावी अशी मागणी होत आहे.येथील आरटीओ कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची संख्या आणि यंत्रणेची कमतरता या बाबी पुढे करून कामांमध्ये चालढकलपणा केला जात असतो. त्यातच अधिकाºयांना सोयीची ड्युटी मिळाली नाही तर ते काम करण्यास टाळाटाळ करतात. शिवाय कार्यालयातील काही कर्मचारी देखील अधिकांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा कित्ता गिरवतात. यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा वचक असणे आवश्यक असतांना मात्र तसे होतांना दिसून येत नाही.
ड्युटी लावण्याचा वादातून पडले दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:18 PM