ऑनलाईन लोकमत1 सप्टेंबरनंदुरबार : तळोदा तालुक्यातील बुधावल येथील शेतक:याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचा:यास 22 हजार रूपये देऊनही शेतीसाठी वीज मिळाली नाही़ यामुळे दोन हेक्टर ऊसाचे नुकसान झाले आह़े बुधावल येथील मनसू रूपा वसावे यांचे धवळीविहिर शिवारात दोन हेक्टर क्षेत्र आह़े याठिकाणी त्यांनी यंदा ऊसाची लागवड केली होती़ या लागवडीनंतर त्यांनी वीज वितरण कंपनीच्या ग्रामीण कक्षात भेट देऊन डिमांडसाठी विचारणा केली़ मात्र याठिकाणी उपस्थित असलेल्या मोतीलाल भिमसिंग राऊत यांनी 22 हजार रूपये द्या वीज पुरवठा सुरू करतो असे, सांगितले मनसू वसावे यांनी डिमांडसाठीचे पैसे समजून त्यास पैसे दिल़े मात्र तळोदा ग्रामीण कक्षाकडून वीज पुरवठा सुरू करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही़ याबाबत वसावे यांनी 17 जून रोजी कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना तक्रार करूनही कारवाई झालेली नाही़ दरम्यान शेतकरी वसावे यांनी तळोदा येथे 19 ऑगस्ट रोजी झालेल्या जाहिर सभेत याबाबत तक्रार करूनही डिमांड देण्याबाबत कारवाई झाली नाही़ यामुळे वसावे यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आह़े संबधित वायरमन राऊत यांनी 22 हजार रूपये घेतल्याची माहिती असूनही तळोदा येथील वीज कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे वसावे यांचे म्हणणे आह़े या वायरमन आणि इतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आह़े
22 हजार देऊनही दोन हेक्टर ऊस कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:27 AM
वीज कंपनीचा कारभार : तळोदा तालुक्यात शेतक:याचे नुकसान
ठळक मुद्दे ऊसाची भरपाई करून द्यावी मोतीलाल राऊत या वायरमनने डिमांडच्या नावाने घेतलेले पैसे परत केले जात नसल्याची तक्रार वसावे यांनी आमदार पाडवी यांच्याकडे केली होती़ मन्सू वसावे यांनी लागवड केलेला सर्व पाच एकर ऊस पाण्याविना जळून गेला आह़े मन्सू वसावे यांनी सां