शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शहाद्यातील दोघांना गावठी पिस्तुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील रहिवासी असलेल्या दोघांना बोरीवली येथून पोलिसांनी चार गावठी बनावटीचे पिस्तुले आणि १० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरातील रहिवासी असलेल्या दोघांना बोरीवली येथून पोलिसांनी चार गावठी बनावटीचे पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा शहरातील काझीपुरा भागातील एक ४२ वर्षीय व इक्बाल चाैक परिसरात राहणारा ३० वर्षीय संशयित पिस्तुलांची विक्री करण्यासाठी बोरीवली परिसरात येणार असल्याची माहिती तेथील क्राईम ब्रांचचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बोरीवली येथे नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केली होती. दरम्यान, शहादा येथील चारचाकी वाहन दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यांची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान दोघांकडे चार गावठी बनावटीचे पिस्तुल व १० जिवंत काडतुसे असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दोघांना तातडीने अटक करण्यात येऊन त्यांच्याविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघा संशयितांना १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहादा परिसरात मध्य प्रदेशातून होणाऱ्या गावठी कट्ट्याच्या अवैध धंद्यांची पाळमुळे असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.