ऑनलाईन लोकमत
नवापूर,दि.5 - नवापूरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच बाजारपेठ बंद होती. बंदचा आग्रह करतांना नाश्ता विक्रेत्याला बळजबरी करण्यात आली. त्याच्या गरम तेलाच्या कढईत पाणी ओतल्याने दोनजण भाजल्याची घटना सकाळी मच्छीबाजार परिसरात घडली.
सोमवारी अनेक छोटेमोठय़ा विक्रेत्यांनी सकाळी दुकान लावण्यासाठी आले होते. शिवाय खरेदीसाठी देखील शहरासह ग्रामिण भागातून नागरिक आले होते. परंतु बंदचे आवाहन करण्यात आल्यामुळे अनेकांना आल्यापावली मागे फिरावे लागले. तर काहींनी मिळेल त्या भागात भाजीपाला विक्री करून काढता पाय घेतला. बसस्थानक परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी सकाळी तयार केलेले खाद्य पदार्थ अखेर मोफत वाटप करून आपली लॉरी व हॉटेल बंद केली. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेर्पयत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
आंदोलक शहरात बंदचे आवाहन करीत होते. मच्छीमार्केट परिसरात बंदचे आवाहन करणा:यांपैकी काहींनी नाश्ताची लॉरी चालकांच्या कढईत पाणी ओतले. कढईत गरम तेल असल्यामुळे ते उडून दोनजण किरकोळ भाजले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले.