नंदुरबार : सुटीच्या दिवशी तोरणमाळ येथे पर्यटन करून परत गावी जातांना अपघात होऊन मोटरसायकलस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना शहाद्यात घडली. प्रजासत्ताकदिनी सायंकाळी हा अपघात झाला.शिंदखेडा येथील टाकरखेडा व मंदाणा येथील युवराज सत्तारसिंग गिरासे (४४), सुरेश नागो सोनवणे (३६) व सोमनाथ झुलाल गांगुर्डे (३४) हे सुटीनिमित्त तोरणमाळ येथे पर्यटनासाठी गेले होते. सायंकाळी परत गावी जात असतांना शहाद्यानजीक त्यांच्या मोटरसाकलीला अपघात झाला. त्यात युवराज गिरासे व सुरेश सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर सोमनाथ गांगुर्डे हे गंभीर जखमी झाले. शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पर्यटनाला गेलेले दोघे अपघातात ठार
By admin | Published: January 27, 2017 9:21 PM