शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

17 लाखांच्या कापूससह दोघांनी ट्रकही पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:48 AM

अनरद बारी : वडाळीत चार लाखाच्या कापडाच्या गाठींची चोरी

नंदुरबार : अनरद शिवारातून 17 लाखाच्या कापूसह ट्रक पळविल्याची घटना 10 रोजी रात्री घडली तर वडाळी शिवारातील हॉटेल परिसरात  ट्रकमधून चोरटय़ांनी तीन लाख 86 हजार रुपये किंमतीच्या कापडाच्या गाठी चोरून नेल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.मध्यप्रदेशातून गुजरातकडे कापूस गाठी घेवून जाणारा ट्रक दोघांनी हॉटेलच्या आवारातून लंपास केल्याची घटना अनरद, ता.शहादा शिवारात घडली. 17 लाख 72 हजारांचा कापूस तर ट्रकची किंमत चार लाख रुपये आहे.मध्यप्रदेशातील धार येथील व्यापारी महेंद्रकुमार तनसुखराय अग्रवाल यांनी गुजरातमध्ये विक्रीसाठी 15 हजार 665 क्विंटल कापूस ट्रकने (क्रमांक एमपी 09 एचएफ 1629) पाठविला होता. ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील अनरद शिवारातील हॉटेल उगाईवर हा ट्रक 10 ऑगस्ट रोजी रात्री थांबला होता. त्यावेळी संशयीत इरफान याकुबखान रा.वलवड व जितेंद्र जगदीश देवला रा.अजमल (मध्यप्रदेश) यांनी चालकाची नजर चुकवून हा ट्रक लंपास केला.17 लाख 72 हजार 636 रुपयांचा कापूस व चार लाख रुपयांचा ट्रक असा एकुण 21 लाख 72 हजार 636 रुपयांचा मुद्देमाल दोघांनी चोरून नेला. व्यापारी महेंद्रकुमार अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून इरफानखान व जितेंद्र देवला यांच्याविरुद्ध        शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास   सहायक पोलीस निरिक्षक पगार करीत आहे.वडाळी शिवारातून चार लाखाच्या कापडाच्या गाठी चोरीस दुसरी घटना वडाळी शिवारात घडली, ट्रकची ताडपत्री कापून चोरटय़ांनी तीन लाख 86 हजार रुपयांच्या कापडाच्या गाठी लंपास केल्या.शहादा-शिरपूर रस्त्यावर गुजरातमधून मध्यप्रदेशात कापडाच्या गाठी घेवून ट्रक (क्रमांक एमएच 15 बीए 2933) जात होता. 6 ऑगस्ट रोजी रात्री ट्रक वडाळी गावाच्या शिवारातील हॉटेल परिसरात थांबला असता चोरटय़ांनी ट्रकची ताडपत्री कापून आतील 14 कापडाच्या गाठी चोरून नेल्या. त्यांची किंमत तीन लाख 86 हजार 314 रुपये आहे. चालकाला ही बाब कळाल्यावर त्याने मालकाला याबाबत माहिती दिली. तसेच कापडाचे एकुण गाठी मोजून हिशोब केला.मालकाने शहादा येथे येवून तपास केला. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी रात्री सारंगखेडा पोलिसात गेले. तेथे चालक रऊफखान मजिदखान, रा.शहादा यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार बागले करीत आहे. लागोपाठच्या या दोन घटनांमुळे या परिसरात रात्रीच्या वेळी वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.