नवापूर : एकाच क्रमांकाचे जिल्ह्यात दोन वाहन असल्याचे महिती अधिकार कायद्याअंतर्गत उघड झाले आहे. चार वर्षांत दोन वाहनांना एकच क्रमांक कसा देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत असून यातून प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आह़ेनवापूर येथील कॉलेज रोडवर वास्तव्यास असलेले कमलेश रामधन मीना यांचा ट्रान्सपोर्ट कंपनीचा व्यवसाय असून त्यांनी 2011 साली अवजड माल वाहतूकीसाठी ट्रक खरेदी केला होता़ त्या ट्रकची प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्याकडे अधिकृत नोंदणी केली असता त्यांना एमएच 39 सी 1077 असा क्रमांक देण्यात आला. चार वर्षा नंतर सन 2015 साली कमलेश मीना यांना याच क्रमांकाची महिंद्रा कंपनीची अवजड वाहतूक करणारी दूसरी ट्रक आढळून आली. खात्री करण्यासाठी त्यांनी परिवहन विभागाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर बघितले असता त्यांचा संशय खरा निघाला. या बाबत त्यांनी प्रादेशीक परिवहन विभागाच्या नंदूरबार येथील कार्यालयात खूलासा मागीतला असता प्रथमत: उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. चार वर्षा पासून त्यांचे प्रय} सुरु असुनही संबंधित विभागाकडून कूठलाही प्रतीसाद मिळत नसल्याने मीना यांनी नाराजी व्यक्त करीत तालुका लोकशाही दिनात या बाबतची तक्रार केली. 2011 मध्ये एका वाहनास दिलेला क्रमांक 2015 मधे पुन्हा दुस:या वाहनास कसा दिला गेला? हा प्रकार बेकायदेशीर असून या बाबत आठ दिवसांत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खूलास न आल्यास व माङया वाहनाचा असलेला क्रमांक आहे तसाच ठेवून दुस:या वाहनाचा तोच क्रमांक रद्द न केल्यास वरिष्ठ पातळीवर जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी कमलेश मीना यांनी 6 सप्टेंबर रोजी महिती अधिकार कायद्यांअंतर्गत माहिती मागितली असता अभिलेख विभागाकडून दोन वाहन धारकांना एकच क्रमांक देण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे.दरम्यान दुसरे वाहन हे शासनाकडे भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे दिसून आले आह़े हे वाहन कोणाच्या मालकीचे याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत़ कमलेश रामधन मीना यांनी राज्याचे परिवहनमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्या कार्यालयाकडून कोणताही खुलासा न मिळाल्याने नवापूर तालुका लोकशाही दिनात उप प्रादेशिक परिवहन कार्यालया कडून एकच क्रमांक दोन वाहनांना दिल्याची बाब बेकायदेशीर असून सबंधित विभागाची सखोल चौकशी करून दोषी अधिका:यांवर कठोर कारवाई करून आठ महिन्यांपासून वाहन उभे असल्याने त्यापोटी झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी. नोंदणी असलेला क्रमांक न बदलता आहे तशीच नोंदणी ठेवण्यात यावी अशी मागणी आजच्या लोकशाही दिनात त्यांनी केली आहे.
नंदुरबारात एकाच क्रमांकाची दोन वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:47 PM