लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशानंतर दोन दिवसात वाळू वाहतूक करणा:या 31 वाहनांवर कारवाई करत जप्त करण्यात आली़ या कारवाईमुळे अैवधरित्या वाळू वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आह़े या वाहनचालकांकडून प्रशासनाने 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला आह़े गुजरात राज्यातील हातोडा येथील तापी नदीपात्रातून उत्खनन केलेली वाळू नंदुरबार मार्गाने नाशिक जिल्ह्यात वाहून नेली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या़ महाराष्ट्र राज्यात वाहतूकीचा कोणताही परवाना नसताना वाळू विनासायस वाळूची वाहतूक सुरु असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा होऊन जिल्हा प्रशासनाचा महसूल बुडत होता़ हा प्रकार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केलेल्या आदेशानुसार गुरुवारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांच्यासह मंडळाधिकारी व तलाठी यांच्या पथकाने गुरुवारी 29 तर शुक्रवारी दोन वाहने ताब्यात घेतली़ या वाहनांमधून होणारी वाहतूक ही टनाच्या स्वरुपात असल्याने प्रशासनाने शुक्रवारी ब्रासनुसार मूल्यांकन करु दंडाची रक्कम वसूल केली़ जप्त करण्यात आलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात लावण्यात आली आहेत़ या कारवाईमुळे गुजरात राज्यातून खरेदी करुन महाराष्ट्रात जादा दराने तिची विक्री करणा:या वाळू वाहतूकदारांचे अवैैध व्यवसायाला चाप बसला आह़े जप्त करण्यात आलेली जवळजवळ सर्वच वाहने ही हातोडय़ाकडून नाशिककडे जात असल्याची माहिती आह़े तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात पथकाने केलेल्या कारवाईत आतार्पयत 29 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत़ त्यातून एकूण 166़35 ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली आह़े यापोटी प्रशासनाने 82 लाख 95 हजार 60 रुपयांचा दंड वाळू वाहतूकदारांकडून वसुल करण्यात आला आह़े प्रशासनाने जीजे 05 एङोड 1899, एमएच 18 बीजी 4589, एमएच 15 एफव्ही 0249, एमएच 15 टीव्ही 5499, एमएच 15 एफजी 9140, एमएच 15 सीके 8925, एमएच 15 डीके 7266, एमएच 18 एसी 7444, एमएच 15 एफव्ही 9199, एमएच 18 एए 9914, एमएच 41 एयु 1587, एमएच 15 ईई 1555, एमएच 15 डीके 9499, एमएच 41 एयू 3907, एमएच 15 डीके 8666, एमएच 18 बीए 351, एमएच 20 सीटी 9006, एमएच 41 एयू 8176, एमएच 41 एयू 2999, एमएच 04 डीके 2816, एमएच 15 एएफ 5040, एमएच 41 एयू 1666, एमएच 15 डीके 3915, एमएच 15 एफव्ही 6279, एमएच 15 एफव्ही 8177, एमएच 46 एआर 8193, एमएच 15 एफव्ही 5055, एमएच 15 ईएफ 5716, एमएच 18 एए 7077 या वाहनांवर कारवाई करण्यात आली आह़े प्रत्येक वाहनावर किमान 3 लाख 20 हजार रुपयांर्पयत दंड आकारण्यात आला आह़े ही वाहने नंदुरबार शहर आणि परिसरातून ताब्यात घेण्यात आली़ शुक्रवारी सकाळी नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी कोकणी हिल जवळून एमएच 15 ईजी 7482 तर तहसीलदार थोरात यांनी तळोदा रोडवरुन आरजे 01 जीबी 6347 हे वाळू वाहणारे वाहन ताब्यात घेत कारवाई केली़ दोन्ही वाहनांचा उशिरार्पयत पंचनामा सुरु होता़ दरम्यान गुजरात राज्याच्या रॉयल्टीवर महाराष्ट्रातून वाळू वाहून नेणारे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा संदर्भ कारवाई करणा:या अधिका:यांना देतात़ परंतू असा कोणताही आदेश निघालेला नाही़
दोन दिवसात अवैैधरित्या वाळू वाहणारी 31 वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:44 PM