ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.2 - अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे दुचाकीवरून युवतीला पळवून नेत असताना, दुचाकी घसरल्याने युवतीसह युवक जखमी झाला़ ही घटना 28 रोजी दुपारी चार वाजता घडली़
महुरवाडी ता़अक्कलकुवा येथील युवतीला सूरज विजयसिंग वसावे व हेमराज कोयसिंग वसवे हे दोघे मोटारसायकलीवरून पळवून नेत होते. तिघे खापर गावातील संत जगनाडे महाराज महाविद्यालयाजवळ येताच दुचाकी घसरली़ यात युवतीसह दोघे युवकही जखमी झाल़े या घटनेनंतर युवतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अपघातात जखमी दोघांसह युवतीवर अक्कलकुवा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत़