लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा येथील तापी नदीत मासे मारण्यासाठी जाळे टाकले होते ते काढत असतांना मासे जाळ्यात येण्याऐवजी चक्क मोटर सायकल त्यात अडकली. ही मोटर सायकल कोणाची? आली कुठून? चोरीची आहे का? अपघातग्रस्त आहे? असे असंख्य प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत. प्रकाशा येथील तापी नदीत मासे मारण्यासाठी नेहमीप्रमाणे आकाश ङिांगाबाई हे गेले होते. 5 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मासे मिळविण्यासाठी जाळे तापी पात्रात टाकून घरी परतले दुस:या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी सकाळी सहा वाजता जाळे काढण्यासाठी संगमेश्वर मंदीराकडून समोरच्या कोरीट गावाकडे नावेने निघाले. कोरीट हद्दीमध्ये असलेल्या तापी नदीतून जाळे बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली असता सुरुवातीला त्यांना काहीतरी जड अशी वस्तु लागल्याचे समजले खूप मोठा मासा हाती लागला म्हणून ते पुन्हा घरी आले. ङिांगाभोई समाजाचे प्रमुख सिताराम भगत ङिांगाभोई यांना त्यांनी सांगितले. रतिलाल ङिांगाभोई, बिरजू ङिांगाभोई, ईश्वर ङिांगाभोई, राजू ङिांगाभोई यांच्यासह सर्वजण नदी पात्रात गेले. ज्या ठिकाणी जाळे टाकले होते अशा ठिकाणी पोहोचल्यावर सर्वजण टाकलेले जाळे ओढू लागले. तेव्हा सर्वप्रथम मोटरसायकलचा हँडलनंतर आरसा लागला. मासेमारीची जाळी फाटु नये म्हणून थेट पाण्यात उतरले तर त्यांना चक्क मोटरसायकलच दिसून आली. या सर्वांनी मोटर सायकल बाहेर काढली. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे गौतम बोराले यांना सदर घटना सांगितली. मोटर-सायकल लाल रंगाची आहे, सुपर स्प्लेंडर असून (क्रमांक एम.एच. 39 एए 8966) असा नंबर आहे. दुचाकीवर शेवाळ साचले असल्याने ती अनेक दिवसांपासून पाण्यात असण्याची शक्यता आहे.मोटर सायकल तापी पात्रात आली कशी?, केंव्हापासून पाण्यात आहे? पाण्यात वाहून आली की, की कोणी मुद्दाम टाकली आहे? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. नदी पात्रात चक्क मोटर सायकल सापडली आहे त्यामुळे गावात चर्चेला उधाण आलं आहे.
मासेऐवजी अडकली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:34 PM