ठळक मुद्देपिडितांना तात्काळ लाभ देण्याचा प्रयत्न- जाधव
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लैंगिक अत्याचारांचे बळी ठरल्यानंतर समाजात पुन्हा ताठ मानेने उभे राहता यावे, यासाठी शासनाने पिडित बालिका, युवती आणि महिलांसाठी मनोधैर्य योजना 2013 मध्ये सुरू केली होती़ याअंतर्गत गेल्या दोन वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील 28 पिडित बालिका आणि युवतींना आर्थिक लाभ मिळाला आह़े मागील दोन वर्षात मनोधैर्य योजनेतील लाभार्थी युवतींना तात्काळ लाभ मिळत असला, तरी बालिकांवर अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्याचेही या योजनेच्या माध्यमातून समोर आले आह़े जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यामार्फत चालवण्यात येणारी मनोधैर्य योजना यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली आह़े पूर्वीचे जिल्हा क्षतीसहाय्य व पुनवर्सन मंडळ बरखास्त करून तेथील निवडक सदस्यांचा समावेश कायम ठेवत ही योजना पुढे सुरू झाली आह़े विधी सेवा प्राधिकरणसमोर पिडिताचा दावा दाखल झाल्यानंतर त्यावर तात्काळ सुनावणी करून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत आह़े पिडितेवर झालेल्या अत्याचारांचे गांभिर्य आणि गुन्ह्यांची व्यापकता तपासून योग्य तो लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास विभागाकडून देण्यात आली आह़े दोन वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील 28 पिडित बालिका आणि युवतींना आर्थिक लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:55 AM