शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

गावाचा सुपूत्र खासदार झाल्याचा ‘उमज’येथे आनंदोत्सव

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: May 31, 2018 1:32 PM

राजेंद्र गावीतांचा विजय : साखर वाटली, फटाके फोडले, ढोलचाही निनाद

मनोज शेलार । ऑनलाईन लोकमतनंदुरबार : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासदरकीच्या निवडणुकीत यश न मिळाल्याने आणि राजकीय पुनर्वसन देखील होण्याची शक्यता कमी असल्याने पालघर गाठून तेथे व्यवसाय सुरू करणारे आणि त्या माध्यमातून राजकारणात गेलेले राजेंद्र धेडय़ा गावीत यांचे अखेर खासदारकीचे स्वप्न पुर्ण झाले. मुळचे उमज, ता.नंदुरबार येथील रहिवासी राजेंद्र गावीत आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पूर्वीपासूनच सार्वजनिक जिवनात सक्रीय आहेत. गावीत यांच्या विजयाचा आनंद त्यांच्या गावी मोठय़ा जल्लोषात साजरा झाला. माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांचे मुळगाव उमज, ता.नंदुरबार. विद्यार्थी दशेपासूनच ते सार्वजनिक जिवनात सक्रीय होते. 1992 ते 96 या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याचा प्रय} केला. महत्त्वाकांक्षी असलेल्या गावीत यांनी 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदार संघातून समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी यश अजमविण्याचे ठरविले. परंतु तेथेही त्यांना अपयश आले. काँग्रेस पक्षात राहून त्यांनी विधानसभा उमेदवारीसाठी देखील प्रय} केले. परंतु नंदुरबारात राजकीय पुनर्वसन होणार नाही आणि लोकप्रतिनिधी बनण्यासाठीही फारशी संधी नसल्याचे हेरून त्यांनी पालघर येथे व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. तेथे गॅस एजन्सीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करतांनाच आधीच अंगात असलेले राजकारण आणि चळवळीचे संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे पालघरमध्येही त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून कामांना सुरुवात केली. नंदुरबारचे माजी खासदार माणिकराव गावीत, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन राहिले आहे. अखेर त्यांना 2006 मध्ये पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून तिकिट मिळाले परंतु ते निसटत्या मतांनी पराभूत झाले. परंतु 2009 च्या निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे विजयी झाले. त्यावेळी त्यांना आदिवासी खात्याचे राज्यमंत्रीपदही मिळाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पहावा लागला. गेल्या महिनाभात झालेल्या राजकीय घडामोडीत त्यांनी भाजपचा हात धरला आणि खासदारही झाले.उमज येथे आनंदोत्सव त्यांच्या उमज या मुळ गावी गुरुवार सकाळपासूनच आनंदोत्सव साजरा झाला. न्यूज चॅनेलवरील बातम्या व त्यांना मिळाणारी फेरीनिहाय आघाडी पाहून आनंदात अधीकच भर पडत होता. गावी त्यांचे मोठे बंधू दत्तू धेडय़ा गावीत असतात. ते शेती करतात. याशिवाय त्यांचे काका, चुलत भाऊ, पुतणे देखील आहेत. त्यांच्या घराजवळ गावक:यांनी एकच गर्दी केली. मोठे बंधू दत्तू गावीत यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला. पुतणे प्रदीप वळवी व इतरांनी ढोल वाजवून जल्लोष केला. उपसरपंच रोशन वळवी हे देखील सहभागी झाले. मोठय़ा बंधूनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून शुभेच्छा दिल्या.नंदुरबारलाही फटाके फोडलेनंदुरबारातील त्यांच्या मित्र परिवाराने देखील फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. निलेश तवर यांच्यासह इतर मित्र परिवार सहभागी झाले होते.जिल्ह्याने दिले दोन खासदार व एक आमदारजिल्ह्यातील रहिवासी असलेले परंतु जिल्हाबाहेर आपली राजकीय कारकिर्द  करणारे दोनजण खासदार तर एकजण आमदार झाले आहेत. राजेंद्र गावीत हे यापूर्वी आमदार व राज्यमंत्री होते. आता खासदार झाले आहेत. शहादा तालुक्यातील रहिवासी खासदार रक्षा खडसे या रावेर, जि.जळगाव मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. नवापूरच्या रहिवासी व माजी खासदार माणिकराव गावीत यांच्या कन्या निर्मला गावीत या इगतपूरी विधानसभा मतदारसंघातून सलग दुस:यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याने इतर ठिकाणी दोन खासदार व एक आमदार दिले आहेत. 

राजेंद्र हा नेहमीच महत्त्वाकांक्षी राहिला आहे. त्याचे खासदारकीचे स्वप्न पुर्ण झाले. त्यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यासाठीही त्यांनी काम करावे अशी अपेक्षा आहे. आमच्या कुटूंबाला त्यांच्या विजयामुळे मोठा आनंद झाला आहे. उमज सारख्या छोटय़ाशा आदिवासी गावाचे नाव त्याने देशात पोहचविले याचे देखील समाधान आहे. -दत्तू गावीत, मोठे बंधू (उमज, ता.नंदुरबार)

राजू दादांनी विजय मिळविल्याचा आनंद आमच्या कुटूंबाला, आमच्या गावाला आहे. विद्यार्थी दशेपासूनच ते सक्रीय होते. नेहमीच मोठे स्वप्न पहाणे त्यांना आवडत होते. त्यांच्या विजयाचा आनंद आम्ही आणखी मोठय़ा प्रमाणावर साजरा करू.-रोशन वळवी, उपसरपंच (उमज, ता.नंदुरबार)