लोकमत ऑनलाईननंदुरबार , दि़ 19 : तालुक्यातील उमर्देखुर्द येथे अक्षयतृतीयेनिमित्त दरवर्षी भरणा:या खंडेरावाच्या यात्रोत्सवानिमित्त यंदाही परंपरेप्रमाणे 12 गाडय़ांची लांगड ओढण्याचा कार्यक्रम जल्लोषात झाला. त्यानंतर साखळदंड तोडण्यात आला.उमर्दे खुर्द येथे खंडेराव महाराजांचे देवस्थान आहे. दरवर्षी याठिकाणी यात्रेनिमित्ताने परिसरातील हजारो भावविक एकत्र येतात. बुधवारी यात्रेनिमित्ताने सायंकाळी गावातील मुख्यरस्त्यावरील मंदिरापासून भगत जितेंद्र साळुंखे यांनी बारा गाडय़ांची लांगड ओढली. या वेळी उपस्थित हजारो भाविकांनी यळकोट यळकोट जयमल्हारचा जयघोष केला. त्यानंतर प्रथापरंपरेप्रमाणे भगत साळुंखे यांनी साखळ दंड तोडली. या वेळी भाविक मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते.
उमर्देखुर्द येथे साखळदंड तोडण्याची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:00 PM