प्रा.डॉ.आय.जी. पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील अवघ्या 28 वर्षे वयाचा तरूण उमेश राजू भोई याच्या चित्रांना युरोप भरारी मिळाली आहे. चित्रकलेच्या माध्यमातून फ्रीलान्स आर्टीस्ट म्हणून नावारुपास येण्याची त्याची इच्छा आहे.नवापूर शहरातील जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेला अवघ्या वीस वर्षे वयाचा तरूण चित्रकलेच्या ध्यासापोटी मुंबईत येतो आणि सहा वर्षात चित्रकलेचे धडे गिरवितो. महाविद्यालयाच्या वातावरणात त्याच्यातील चित्रकार प्रगल्भ होऊ लागतो. त्याच्या कुंचल्यातून व्यक्त होणा:या आशयाला ‘कॅमलिन आर्ट फाऊंडेशनच्या’ मुंबईच्या नामांकित कंपनीची दाद मिळते आणि कंपनीतर्फे युरोप कला दौ:यासाठी निवड करण्यात येणा:या मोजक्या चित्रकारांमध्ये त्या तरुणाचा समावेश केला जातो. ही यशोगाथा आहे नवापूरच्या उमेश राजू भोई या तरुण चित्रकाराची ! उमेशचे बारावीर्पयतचे शिक्षण येथील सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे झाले. बालपणापासूनच चित्रकलेचा ध्यास घेतलेल्या उमेशला चित्रकलेची आवड निर्माण झाली ती सार्वजनिक मराठी हायस्कूल चित्रकलेचे शिक्षक कै.नारायण मराठे यांच्याकडून. वडील राजू दशरथ भोई भाजीपाला विक्री व्यवसाय करतात तर आई मंगलाबाई ह्या गृहिणी आहेत. घरात चित्रकलेचा गंधही नाही. काका मोहन वाडीले यांचे घरातून पाठबळ व छायाचित्रकार सुभाष दगा कुंभार यांचे चित्रकलेसाठी त्याला प्रोत्साहन मिळाले. उमेशने दोन वर्षाचा आर्ट टीचर डिप्लोमा धुळे येथे केला. त्यानंतर त्याने सरळ मुंबई गाठली. मुंबई येथे शिक्षण घेत असताना घरच्या गरीबीमुळे पहिले दीड वर्ष रंग वापरले नाही कारण रंगांसाठी पैसेच नव्हते. पार्टटाईम मॉडेलींगचे काम करत दोनशे रुपयेप्रमाणे तो वेळ काढत असे. तेथे फाउंडेशन कोर्स, डिप्लोमा पेंटींगग कोर्स व डिप्लोमा इन एज्युकेशन कोर्स केला. त्याला नुकतेच कॅमलिनने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रोफेशनल कॅटेगिरीतून ‘ऑईल ओन कॅनव्हास’ या माध्यमात ‘स्वत:च्या शोधात’ या चित्रशीर्षक असलेल्या चित्राला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून 15 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या युरोप कला दौ:यासाठी त्याची निवड करण्यात आली. महाविद्यालयीन जीवनातही त्याने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आजर्पयतच्या चित्रकलेच्या प्रवासात ऑस्ट्रेलिया, इटली, डेन्मार्क, अमेरिका, भारतातील जम्मू, गोवा व कर्नाटक अशा ठिकाणच्या रसिकांनी त्याची चित्रे खरेदी केली आहेत. नंदुरबार जिल्ह्याची आदिवासी संस्कृती ही चित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पोहोचवण्याची व चित्रकलेच्या माध्यमातून फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून नावारुपास येण्याची त्याची इच्छा आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये चांगला चित्रकार दडला असून त्यांना मार्गदर्शन व त्यांचे कलागुण विकसित करण्याची गरज असून त्यासाठी प्रय} करणार आहे. युरोप दौ:यात तो पॅरिस येथील पंधराव्या व अठराव्या शतकातील मास्टर पेंटींग संग्रहालयास भेट देऊन अभ्यास करणार असल्याचे त्याने सांगितले.
उमेशच्या चित्रांची युरोप भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:47 PM